Health Tips : आपल्या मानसिक आरोग्याचा (World Mental Health Day) आपल्या शारीरिक आरोग्याशी थेट संबंध आहे. ते निरोगी ठेवण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची, त्याची गरज समजून घेण्याची आणि जे लोक वाईट मानसिक आरोग्यातून जात आहेत त्यांना मदत करण्याची गरज आहे.

अशा प्रकारे तुम्हाला चिंता आणि तणावापासून आराम मिळू शकतो

- जेव्हा जेव्हा तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल तेव्हा एकटे राहून त्याच्याशी संघर्ष करण्याऐवजी, ज्याच्याकडून तुम्हाला सकारात्मकता मिळते अशा व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला बरे वाटते. अशा लोकांची तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप मदत होते. हा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा तुमचा जोडीदारही असू शकतो.

- जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटत असेल आणि रडावेसे वाटत असेल तर थोडा वेळ डोळे बंद करून एके ठिकाणी बसा. पाणी प्या आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे, अस्वस्थतेमुळे वेगवान हृदयाचे ठोके सामान्य होतील.  आणि तुमचं मनही थोडा वेळ शांत राहील.

- तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी मनातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टींना वेळ दिल्याने तुम्ही त्या कामात व्यस्त राहता. आणि तणाव विसरण्यास मदत होते. यासाठी तुम्ही काही चित्रपट पाहू शकता, खरेदी करू शकता, मित्रांबरोबर पार्टी करू शकता किंवा तुमची कोणतीही आवड फॉलो करू शकता.

- तणाव दूर करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे काही दिवसांसाठी तुम्ही बाहेर सहलीला जाऊ शकता. यामुळे एक वेगळ्या प्रकारची शांतताही मिळते. स्वत:चा शोध घेता येतो.

- सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे. स्वतःचं आत्मपरिक्षण करा. असे केल्याने अनेक वेळा तुम्हाला तुमची चूक नेमकी कुठे झाली आहे हे समजण्यास मदत होईल. तुमच्या चुका समजून घेऊन त्यावर काम करण्याचा हा एक चांगला प्रभावी मार्ग आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Heath Tips : तुमचे डोळे वारंवार कोरडे होतायत का? असू शकतात 'या' आजाराची लक्षणं; वेळीच 'या' सोप्या टिप्स फॉलो करा