Reason of Sleeping During Study : अनेकदा पुस्तक उघडताच झोप येते. हा प्रकार फक्त अभ्यास करणाऱ्या मुलांच्याच बाबतीत नाही तर प्रौढ व्यक्तींबरोबर सुद्धा असे कित्येकदा घडते. मात्र, अनेकदा आपण याकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करतो. यामागे आळस हेच कारण आपण गृहित धरतो. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या सवयीकडे वेळीच गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. 


डोळ्यांच्या स्नायूंवर दबाव


खरंतर, वाचन, अभ्यास करताना आपल्या डोळ्यांवर अधिक दाब पडतो. वाचन करताना आपला मेंदू संगणकाच्या मेमरीप्रमाणे काम करतो. अशा स्थितीत डोळ्यांचे स्नायू शिथिल होऊ लागतात आणि मेंदू थोड्याच वेळात थकून जातो. त्यामुळे आपल्याला झोप येऊ लागते.


शरीर विश्रांती घेते


वाचन करताना झोप लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे वाचन करताना आपलं शरीर विश्रांती अवस्थेत असते आणि फक्त डोळे आणि मेंदू काम करत असतात. अशा स्थितीत संपूर्ण शरीर शिथिल झाल्यामुळे स्नायू शिथिल होऊ लागतात आणि झोप येते. यामुळेच तज्ञ वाचनासाठी एकाच मुद्रेत बसण्याचा सल्ला देतात.


प्रवासातही या कारणामुळे झोप येते


जेव्हा आपलं शरीर विश्रांती घेतं तेव्हा ते झोपण्याच्या पोझिशनमध्ये जातं. हे केवळ अभ्यास करतानाच नाही तर कारमधून प्रवास करतानाही असं घडते. प्रवासात झोपलेले लोकही तुम्ही पाहिले असतील. यामागेही हेच कारण आहे. महामार्गावरील वाहनचालकांनाही झोपेची तंद्री लागते, कारण या वेळेत मन आणि डोळे काम करतात आणि शरीराचा इतर भाग तुलनेने शिथिल राहतो.


झोप न येण्यासाठी काय करावे?



  • यासाठी अभ्यासाच्या ठिकाणी चांगली प्रकाश व्यवस्था असावी. 

  • अभ्यासाच्या ठिकाणी बाहेरची हवा आणि प्रकाश पोहोचला पाहिजे, जेणेकरून बाहेरील हवा आणि प्रकाशासोबत शरीरातील ताजेपणा टिकून राहील.

  • अंथरुणावर बसून कधीही वाचू नका, त्याऐवजी खुर्ची-टेबलवर वाचण्याचा सराव करा. त्यामुळे खुर्ची आणि टेबल पाहून तुमचे मन अभ्यासासाठी तयार होईल आणि आळस येणार नाही.

  • तुमचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी हलका आहार घ्या. तुम्हाला आळस जाणवणार नाही. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल