Weight Gain Tips : आजकाल लोक चांगल्या पर्सनालिटीसाठी वेगवेगळे उपाय करतात. काहीजण जिममध्ये जातात, तर काही डाएट फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट करुन बघतात. वजन कमी करणं जितकं कठीण काम आहे तितकंच वजन वाढवणंही अवघड आहे. काही लोक इतके बारीक असतात की ते जाड होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात 5 पदार्थांचा समावेश करा. तुम्हाला महिन्याभरातच त्याचे परिणाम दिसून येतील.
तूप-साखर खा : मीडिया रिपोर्ट्सनुसार, तूप-साखर हेल्दी पद्धतीने तुमचे वजन वाढवण्याचे काम करते. एक चमचा देशी तुपात एक चमचा साखर मिसळून खा. जेवणाच्या अर्धा तास आधी हे खाल्ल्यास आश्चर्यकारक परिणाम दिसून येईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत.
सुके अंजीर आणि मनुके : जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही अंजीर आणि मनुका खाऊ शकता. 5 सुके अंजीर आणि काही मनुके रोज रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे खा. महिनाभरात शरीर मजबूत होईल.
दूध आणि केळ्याचे सेवन करा : सकाळी लवकर नाश्त्यात एक ग्लास दूध आणि दोन केळी घेतल्यास तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येईल.. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शेक बनवूनही पिऊ शकता. केळी आणि दुधात असलेल्या कॅलरीजमुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते आणि स्टॅमिनाही वाढतो.
दुधासह आंबा खा : अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही आंब्याचे दुधासोबत सेवन करु शकता. नाश्त्यात खाल्ल्याने काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसू लागतो. दोन पिकलेले आंबे खाल्ल्यानंतर हलके कोमट दूध प्या. यामुळे शरीरात आश्चर्यकारक बदल होतात. सध्या आंब्यांचा सीझन आहे त्यामुळे बाजारात अगदी सहज ते मिळू शकतात.
ड्रायफ्रूट्स रामबाण उपाय : जर तुम्ही दररोज शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड, मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्सचे सेवन केले तर तुमच्या शरीराला खूप फायदा होतो. मूठभर ड्रायफ्रूट्स रात्री भिजत ठेवा आणि सकाळी खा. याचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होऊन शरीर मजबूत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Health Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा