Health Tips : थंडीचे दिवस सुरु व्हायला लागले आहे. बदलत्या ऋतूंमध्ये खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर (Health) होतो. त्यामुळे वेळेनुसार आपण आपला आहार बदलला पाहिजे. या हवामानात जर तुम्ही तुमच्या आहारात बदल केला नाही तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उन्हाळा असो किंवा हिवाळा, त्यानुसार आहारात बदल केले पाहिजेत. कारण हवामानातील बदलांमध्ये बहुतांश लोक आजारी पडतात. आता हिवाळा येणार असून हवामानात बदलही सुरू झाला आहे. अशा वेळी योग्य आहाराच्या टिप्स ठरवणं गरजेचं आहे. तसेच, चुकूनही तीन गोष्टी खाऊ नयेत. या तीन गोष्टी नेमक्या कोणत्या याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
लाल मांस (Red Meet)
जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. अशा वेळी तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे पदार्थ खाणे टाळावेत. लाल मांस हे असेच एक खाद्य आहे. ते तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करण्याचे काम करते. बदलत्या ऋतूंमध्ये विषाणू आणि बॅक्टेरिया अधिक सक्रिय होत असल्याने, प्रतिकारशक्ती कमकुवत करणारे अन्न कोणालाही आजारी पाडू शकतात.
तळलेले पदार्थ
जास्त तळलेले अन्न तुम्हाला कोणत्याही ऋतूत आजारी पाडू शकते. परंतु, बदलत्या हवामानात ते अधिक धोकादायक ठरते. तळलेले पदार्थ खाल्ल्याने आजारी पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पोटाशी संबंधित आजारही वाढतात. त्यामुळे तळलेले पदार्थ खाणे टाळावे. तळलेल्या अन्नामध्ये कमी पोषण असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर नसतात.
साखरेचे पदार्थ (Sugar Food)
जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा साखरयुक्त पदार्थांचे सेवन देखील चांगले मानले जात नाही. सणासुदीच्या काळात साखरेचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे या काळात साखरेचे सेवन कमी करावे जेणेकरून अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्या गोष्टींमध्ये रिफाइंड साखर वापरली जाते त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. बदलत्या वातावरणात जर तुम्ही तुमच्या आहारात हे बदल केले तर तुम्ही आजारी पडू शकणार नाही. तसेच, तुमची रोगप्रतिकारकशक्ती देखील चांगली राहील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :