Health Tips : आपल्यापैकी अनेकांच्या अशा सवयी आहेत ज्यांच्याशिवाय आपण कोणतं कामच करू शकत नाही. काहींना चहाची तलप असते तर काहींना कॉफीची, काहींना आईस्क्रिमची आवड असते तर काहींना काही खाण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांचं मन थाऱ्यावर नसतं किंवा कोणत्याच कामात मन रमत नाही. पण, या सगळ्यात मिठाईप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मिठाईची तलप भागवण्यासाठी लोक आपलं आरोग्यही धोक्यात घालतात. साखर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हे माहीत असूनही अनेकजण गोड खाणं काही सोडत नाहीत. रात्रीच्या जेवणानंतर किंवा दुपारच्य जेवमानंतर अनेकांना गोड खाण्यची सवय असते. पण, जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. 


वजन वाढण्याची समस्या 


साखरेचे पेय, भाजलेले पदार्थ किंवा इतर गोष्टी आपल्यासाठी विषासारखे आहेत. WebMed च्या अहवालानुसार, तुम्ही जितकी जास्त साखर खाल तितकं तुमचं वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. एवढेच नाही तर टाइप 2 मधुमेहाचा धोकाही वाढतो. खरंतर, जास्त साखर फॅटच्या पेशींना त्रास देते आणि ते एक रसायन सोडते ज्यामुळे वजन वाढते.


लैंगिक आरोग्यासाठी नुकसानकारक 


रिपोर्ट्सनुसार, साखरेमुळे आपल्या रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम होतो. ही प्रणाली आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित करते. पण, जर तुम्ही खूप गोड पदार्थ खाल्ल्यास किंवा रात्रीच्या जेवणानंतर गोड खात असाल तर वेळीच हे प्रमाण कमी करा. कारण यामुळे तुमच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतो.    


हृदय रोग


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही सतत किंवा रोज मिठाई खात असाल तर त्यामुळे हृदयाच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचते. गोड किंवा साखरयुक्त पेयांचे व्यसन असलेल्या लोकांना वजन वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज गोड खाण्याची सवय लावू नका.


फॅटी लिव्हर


असे मानले जाते की, जास्त गोड खाणे किंवा ते रोज खाल्ल्याने यकृताच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. अनेक प्रकरणांमध्ये, लोक फॅटी यकृताचे रुग्ण देखील बनतात. मिठाईची सवय भविष्यात अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते.


'अशी' बॉडी डिटॉक्स करा


जास्त गोड, तेलकट किंवा बाहेरचे अन्न खाल्ल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही बॉडी डिटॉक्सची प्रक्रिया पाळली पाहिजे. जर तुम्हाला पोटदुखी, छातीत जळजळ, जडपणा किंवा इतर समस्या असतील तर तुम्हाला शरीराचे डिटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात मॅग्नेशियम गरजेचं; अनेक आजारांवर रामबाण उपाय