Health Tips : मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांमधे आढळतो. बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) दिवसेंदिवस या आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की टाईप 1 मधुमेहापेक्षा टाईप 2 मधुमेह जास्त धोकादायक आहे. पण मधुमेहाचे प्रकार कोणते? त्याची लक्षणं आणि त्यावर उपचार नेमका काय या संदर्भात अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मधुमेह हा एक मेटबॉलिसम (चयापचय क्रिया) शी संबंधित आजर आहे जो इंसुलिन प्रतिरोधक किंवा अपर्याप्त इन्सुलिन उत्पादनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवतो. 


मधुमेहाचे  प्रकार : 



  • टाईप 1 ( type 1a अँड type 1b)

  • टाईप 2

  • गरोदरपणात होणारा मधुमेह

  • तरुणांमध्ये होणारा मधुमेह


मधुमेह प्रकार 1 आणि प्रकार 2 वेगवेगळ्या कारणांमुळे होतो


मधुमेह प्रकार 1 मध्ये, स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही, कारण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील आयलेट पेशींवर हल्ला करते जे इन्सुलिन बनवतात. मधुमेह प्रकार 2 मध्ये, स्वादुपिंड पूर्वीपेक्षा कमी इंसुलिन बनवते आणि तुमचे शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनते. 


मधुमेहाची लक्षणं कोणती? 



  • सतत तहान लागणे

  • वारंवार लघवी होणे

  • वारंवार भूक लागणे

  • अचानक वजन कमी होणे

  • जखम लवकर बरी न होणे

  • पायांना सुन्नपणा आणि मुंग्या येणे

  • सतत झोपमोड होणे

  • थकवा येणे 

  • अंधुक दिसणे ही लक्षणे असू शकतात. 


मधुमेह नेमका कशामुळे होतो? 



  • अनुवंशिकता

  • बैठी जीवनशैली

  • लठ्ठपणा

  • पोटाचा वाढलेला घेर

  • व्यायामाची कमतरता

  • अयोग्य आहार

  • मानसिक ताणतणाव


मधुमेहामुळे 'या' समस्या उद्भवतात 


Diabetic foot - पायाला झालेली जखम बरी न होणे
Nephropathy - रक्तातील साखर वाढल्यामुळे किडनी वर ताण येणे
Neuropathy - रक्तातील साखर वाढल्यामुळे हात आणि पायाच्या संवेदना कमी होणे, आणि पायांना सुन्नपणा आणि मुंग्या येणे
Retinopathy - रक्तातील साखर वाढल्यामुळे अंधुक दिसणे
त्वचेचे आजार- 
इत्यादी


मधुमेहा साठी योगोपचार 


सूर्यनमस्कार
विपरीत करणी





हलासन




वक्रासन





कपालभाती प्राणायाम
भुंजगासन





धनुरासन
बालासन





पश्चिमोत्तानासन
शवासन
इत्यादी


मधुमेहासाठी निसर्गोपचार आणि प्रतिबंध 



  • नियमित व्यायाम

  • संतुलित आहार

  • उपवास (तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली)

  • मानसिक ताणाचे नियोजन

  • शास्त्रोक्त पद्धतीने वजन कमी करणे


निष्कर्ष 


मधुमेह हा एक मेटबॉलिसम शी संबंधित विकार आहे जो योग्य आहार, नियमित व्यायाम आणि इतर निसर्गोपचारामुळे पूर्णपणे बरा होऊ शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Winter Child Care Tips : हिवाळ्यात नवजात बाळाला आंघोळ घालण्याची योग्य वेळ कोणती? मुलं आजारी पडणार नाहीत