Health Tips : जसजसं आपल्या मुलांचं वय वाढतं तसतशी पलकांना मुलांच्या उंचीची चिंता वाटू लागते. काही मुलांची उंची सहज वाढते. पण, काही मुलांना त्यांची उंची वाढविण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. अनेकदा अशी मुलं त्यांच्या उंचीमुळे त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात. त्यांची उंची खूप हळूहळू वाढते किंवा उंचीची वाढच खुंटते. अशा परिस्थितीत पालक खूप चिंतेत राहतात. अशा वेळी, तुम्ही मुलांच्या जीवनशैलीत काही बदल करू शकतात ज्यामुळे मुलांची उंची सहज वाढू शकते. यासाठी तुम्हाला मुलांच्या दैनंदिन आयुष्यात काही बदल करावे लागतील ज्यामुळे मुलांची उंची अगदी सहज वाढेल.
मुलांना योगा करायला सांगा
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत. जर मुलाची उंची वाढत नसेल तर मुलाला रोज योगा करण्याची सवय लावा. यामुळे मुलाची उंची वाढू शकते. यासाठी सूर्यनमस्कार, त्रिकोनासन, ताडासन आणि वृक्षासन असे अनेक सोपे व्यायाम आहेत, जे नियमितपणे केल्यास मुलांची उंची वाढण्यास मदत होईल.
स्ट्रेचिंग करा
व्यायामात स्ट्रेचिंग हा देखील महत्त्वाचा प्रकार आहे. ज्यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते. तसेच, स्ट्रेचिंग केल्याने पाठीच्या स्नायूंना बळकटी येते. त्यामुळे स्ट्रेचिंग करा.
मैदानी खेळ खेळा आणि अॅक्टिव्हिटी करा
मुलांनी मैदानी खेळ खेळायला आवडतात. पण, काही मुलं अशी असतात जी खेळण्यासाठी घराच्या बाहेरच पडत नाहीत. अशा वेळी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास आणि शारीरिक क्रिया, हालचाली करण्यास प्रोत्साहित करा. यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच, जर एखादे मूल सायकलिंग करत असेल, फुटबॉल किंवा बास्केटबॉल खेळत असेल किंवा क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळत असेल तर त्याच्या उंचीत लक्षणीय बदल दिसून येतो.
पौष्टिक आहार आणि योग्य झोप
आजकाल मुलांची वेळेवर खाण्याची, पिण्याची आणि झोपण्याची सवय पूर्णपणे बदलली आहे. मुलं बाहेरचे पदार्थ खातात आणि रात्री उशिरा झोपतात. हे मुलांच्या वाढीसाठी चांगले नाही. त्यामुळे मुलांना योग्य वेळी झोपण्याची आणि सकाळी योग्य वेळी उठण्याची सवय लावा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.