Health Tips : दिवसाची सुरुवात छान आणि प्रसन्न व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण, कधी कधी आपल्या काही सवयी आपला संपूर्ण दिवस खराब करतात. यासाठी अशा काही सवयी आहेत, ज्या बदलणे अत्यंत गरजेचं आहे. कारण या सवयी तुमच्या मानसिक तसेच शारीरिक (Health) दोन्हीवर परिणाम करतात. या सवयींमुळे रोगांचा धोका वाढतो आणि कामातही तुमचं लक्ष लागत नाही. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्ही लगेच बदलणं गरजेचं आहे.


उशिरा उठणे


सकाळी उशिरा उठण्याची सवय आरोग्यासाठी तसेच दिवसाच्या सुरुवातीसाठीही चांगली नाही. उशिरा उठल्याने तुमचा संपूर्ण दिनक्रम बदलतो. तुम्ही घाईत ऑफिसला जाता, नाश्ता टाळता. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. सकाळी सर्वात आधी नाश्ता केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. तसेच ज्या लोकांना जास्त वेळ झोपण्याची सवय असते त्या लोकांमध्ये लठ्ठपणा लवकर येतो. 


सकाळी उठल्यानंतर पाणी न पिणे


सकाळी सर्वात आधी पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून अनेकदा दिला जातो. सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय, पचनक्रिया मजबूत होते आणि चयापचय देखील जलद होते, म्हणून दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करा आणि दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्या.


अनहेल्दी अन्नाचं सेवन करणे 


जर तुम्ही सकाळची सुरुवात पिझ्झा, बर्गर यांसारख्या अनहेल्दी पदार्थांनी केली तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. याव्यतिरिक्त, नाश्ता वगळल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता आरोग्यदायी असावा, ज्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक घटकांचा समावेश असतो.


जेवताना टीव्ही पाहणे


जेवताना टीव्ही पाहण्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. खरंतर, टीव्ही पाहताना तुम्ही जेवता तेव्हा तुम्ही किती खात आहात याकडे लक्ष देत नाही. यामुळे तुम्ही किती प्रमाणात खाता याचा अंदाज तुम्हाला येत नाही आणि तुमचं वजन झपाट्याने वाढू लागते.


सकाळी व्यायाम न करणे


चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या आहाराबरोबरच व्यायामही महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सकाळी व्यायाम करत नसाल तर लगेच सुरुवात करा, म्हणजे तुम्ही तंदुरुस्त राहाल आणि तुमचे वजनही वाढणार नाही.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका