Ganesh Chaturthi 2023 : यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत असेल. या काळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी 10 दिवस रोज सकाळ संध्याकाळ ही आरती करावी.

 

ही आरती करून, बाप्पा विघ्न करतील दूरमंगळवारी गणेशाचे देशभरात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले. गणेश चतुर्थीपासून 19 सप्टेंबर 2023 पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढील 10 दिवस लाडका बाप्पा दहा दिवस आपल्या भक्तांमध्ये राहणार आहे. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा करणे आवश्यक मानले जाते, यामुळे कार्य सफल होते. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर विसर्जन होईपर्यंत त्याची विधीनुसार पूजा करावी. पौराणिक मान्यतेनुसार, या काळात दररोज सकाळ संध्याकाळ ही आरती करून श्रीगणेश प्रसन्न होतात. त्यामुळे घरात रिद्धी-सिद्धीचा वास राहतो, असे सांगितले जाते. यावेळी बाप्पा सर्व संकटे दूर करतात. अशी धारणा आहे. 

 

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ।रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥

-----------------------------------------------------------------------------

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरयातू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया ।संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥०१॥

मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया ॥०२॥

तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता ।ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला ॥०३॥

तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या ।पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया ॥०४॥

मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरया ॥

------------------------------------------------------------------------------

गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरयागजानना श्रीगणराया ।आधी वंदू तुज मोरया ॥मंगलमूर्ती श्री गणराया ।आधी वंदू तुज मोरया ॥०१॥

सिंदुर-चर्चित धवळे अंग ।चंदन उटी खुलवी रंग ।बघतां मानस होतें दंग ।जीव जडला चरणी तुझिया ।आधी वंदू तुज मोरया ॥०२॥गजानना श्रीगणराया ।आधी वंदू तुज मोरया ॥

गौरीतनया भालचंद्रा ।देवा कृपेच्या तूं समुद्रा ।वरदविनायक करुणागारा ।अवघी विघ्नें नेसी विलया ।आधी वंदू तुज मोरया ॥०३॥गजानना श्रीगणराया ।आधी वंदू तुज मोरया ॥

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रेगणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ।तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता ।अवघ्या दीनांच्या नाथा ।बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे ।चरणी ठेवितो माथा ॥०१॥

पहा झाले पुरे एक वर्ष ।होतो वर्षानं एकदा हर्ष ।गोड अन्नाचा होतो रे स्पर्श ।घ्यावा संसाराचा परामर्ष ।पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची ।वाचावी कशी मी गाथा ॥०२॥

आली कशी पहा आज वेळ ।कसा खर्चाचा बसावा मेळ ।गूळ-फुटाणे खोबरं नि केळं ।साऱ्या प्रसादाची केली भेळ ।कर भक्षण आणि रक्षण ।तूच पिता तूच माता ॥०३॥

नाव काढू नको तांदुळाचे ।केले मोदक लाल गव्हाचे ।हाल ओळख साऱ्या घराचे ।दिन येतील का रे सुखाचे ।देवा जाणुनि गोड मानुनि ।द्यावा आशीर्वाद आता ॥०४॥

-----------------------------------------------------------

घालीन लोटांगणघालीन लोटांगण वंदिन चरन ।डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।भावे ओवालीन म्हणे नामा ।त्वमेव माता पिता त्वमेव ।त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।त्वमेव सर्वम मम देव देव ।कयें वच मनसेन्द्रियैवा ।बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।करोमि यद्यत सकलं परस्मै ।नारायणायेति समर्पयामि ॥०१॥

अच्युत केशवम रामनरायणं ।कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥

हरे राम हरे राम ।राम राम हरे हरे ।हरे कृष्णा हरे कृष्णा ।कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥

हरे राम हरे राम ।राम राम हरे हरे ।हरे कृष्णा हरे कृष्णा ।कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥

-------------------------------------------------------------------------------

शेंदुर लाल चढ़ायोशेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को ।दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को ।हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को ।महिमा कहे न जाय लागत हूं पद को ।जय देव जय देव ॥०१॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।जय देव जय देव ॥०२॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे ।जय देव जय देव ॥०३॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।जय देव जय देव ॥०४॥

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2023: 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन का करतात? पौराणिक कथा जाणून घ्या