Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आवश्यक असतात. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण, आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील पोषक तत्वांची आवश्यकता असते.


मॅग्नेशियम हे एक पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यास आणि नसा निरोगी ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर, हे पोषक तत्व आपल्याला आपले शरीर पूर्णपणे कार्यक्षम बनविण्यात मदत करते.


मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मुंग्या येणे, बधीरपणा, स्नायू क्रॅम्प, भूक न लागणे, ऑस्टिओपोरोसिस, निद्रानाश होणे, दमा, डोकेदुखी, अशक्तपणा इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर कधी कधी याच्या कमतरतेमुळे आपले मनही निस्तेज होते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींद्वारे आपण मॅग्नेशियमच्या कमतरतेवर मात करू शकतो.


मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मद्याचे अतिसेवन, अतिसार, व्हिटॅमिन डीची कमतरता, मॅग्नेशियमयुक्त पदार्थ अन्नात न घेणे इत्यादी अनेक कारणे असू शकतात. यासाठी तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.


मॅग्नेशियम समृद्ध अन्न


काजू-बदाम


तुमच्या शरीराला आवश्यक असलेले मॅग्नेशियम मिळवण्यासाठी दररोज मूठभर काजू आणि बदाम खाणे हा एक चांगला पर्याय आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते, त्यामुळे त्याचा आहारात समावेश करा.


केळी


पोटॅशियमने युक्त केळी हा हृदयाच्या आरोग्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम शरीरासाठी आवश्यक आहे. 


क्विनोआ


शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे 10 ते 15 मिलीग्राम मॅग्नेशियम असते, जे अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय यामध्ये प्रथिनेही भरपूर प्रमाणात असतात. 


ज्वारीची चपाती


ज्वारीमध्ये मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे चपाती, पुरी किंवा पराठ्याच्या रूपात याचे सेवन केल्याने आपल्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता कधीच भासणार नाही.


मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर


मूग हे देखील मॅग्नेशियम समृद्ध अन्न आहे. सकाळच्या नाश्त्यात कोशिंबीर तयार करा, त्यात मूग, बारीक चिरलेला कांदा, हिरवी धणे, हिरवी मिरची, चाट मसाला इत्यादी मिसळून त्याचे सेवन करा. तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


World Diabetes Day 2023 : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आजपासूनच तुमच्या सकाळच्या दिनचर्येत 'या' सवयींचा समावेश करा