Health Tips : दरवर्षी सप्टेंबर महिना PCOS जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. पीसीओएसबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्याचा उद्देश आहे. PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही एक समस्या आहे ज्यामध्ये महिलांच्या शरीरात पुरुष हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. चेहऱ्यावर नको असलेले केसही दिसू लागतात. हे टाळण्यासाठी चांगल्या खाण्याच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. PCOS मध्ये सकस आहार घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हेल्दी काही खाणे शक्य नसेल तर तुम्ही काही हेल्दी स्मूदीज खाऊ शकता, ज्यामुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.  अशाच काही हेल्दी स्मूदीच्या रेसिपीज बद्दल जाणून घेऊयात.


एवोकॅडो आणि अननस स्मूदी


एवोकॅडो आणि अननस मिक्स करून तुम्ही चवदार आणि हेल्दी स्मूदी तयार करू शकता. 


साहित्य


1/4 कप- एवोकॅडो, अर्धा कप अननस, अर्धा कप केळी (बारीक केलेले), एक कप दही, एक कप- पालक.


कृती


पालक धुवून बारीक करा, आता त्यात अननस आणि एवोकॅडो घाला.
तेही बारीक करून घ्या, आता त्यात एक कप पाणी आणि दही घालून मिक्सर पुन्हा चालवा.
तुमची स्मूदी तयार आहे.


केळी आणि खजूर स्मूदी


केळी आणि खजूर स्मूदी केवळ चवदारच नाही तर खूप आरोग्यदायी देखील आहे. हे तुम्हाला बराच काळ भरभरून ठेवते. 


साहित्य


एक-दोन केळी, अर्धी वाटी खजूर, चिमूटभर दालचिनी पावडर, एक चमचा पीनट बटर, एक वाटी दूध.


कृती


हे बनवण्यासाठी सर्वात आधी केळी बारीक कापून मिक्सरमध्ये घाला.
आता त्यात खजूर आणि पीनट बटर मिक्स करा.
त्यात दूध घालून स्मूदी तयार करा.
जर तुम्हाला ते खूप घट्ट वाटले तर त्यात थोडे पाणी घाला. तुमची स्मूदी तयार आहे.


बीट आणि ब्लूबेरी स्मूदी


बीट आणि ब्लू बेरी स्मूदी तुमच्यासाठी पौष्टिक आहे. त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. 


साहित्य


1/4 बीट, एक कप ब्लू बेरी, अर्धी केळी, एक किंवा दोन चमचे ड्राय फ्रूट्स, एक कप दही.


कृती


सर्वात आधी बीट धुवून कापून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
आता ब्लू बेरी, केळी आणि दही मिक्स करा हे मिश्रणदेखील मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
तुमची हेल्दी स्मूदी तयार आहे. त्यावर थोडे ड्रायफ्रूट्स घालून छान सजवा.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?