Health Tips : सायलेंट हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांमुळे सर्वांनाच चिंता वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे सायलेंट हार्ट अटॅकच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे, तो विचार करायला लावणारा आहे. या प्रक्रियेत मृत्यूचे कारण हे कळू शकत नाही की या नेमकी लक्षणे काय आहेत? त्यामुळे जेव्हाही तुम्हाला ही लक्षणे दिसतील तेव्हा काळजी घ्या. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात.
'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
छातीत सौम्य घट्टपणा किंवा वेदना ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात. बरेच लोक याला गॅसची समस्या समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. 10 नोव्हेंबर 2015 रोजी अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले. त्यानुसार, 45-84 वर्ष वयोगटातील सुमारे 2,000 लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, सुरुवातीला कोणालाही हृदयविकाराचा झटका येत नव्हता.
मधुमेहाच्या रुग्णांनी सावधान
ज्या लोकांवर संशोधन करण्यात आले त्यापैकी 80 टक्के असे लोक होते ज्यांना आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अटॅक झाला आहे याची जाणीवही नव्हती, कारण तो एकतर सायलेंट होता किंवा अगदी किरकोळ होता. डायबेटिक रुग्णांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. वास्तविक, लोक मधुमेहाच्या अधिक सौम्य लक्षणांकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांचा परिणाम नसांवर होतो. त्यामुळे मज्जातंतूंना हळूहळू हे संकेत जाणवणे बंद होते आणि समस्या वाढते.
महिलांना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो
संशोधनात असे आढळून आले आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. काही स्त्रिया अशा असतात ज्यांची वेदना सहन करण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळेच त्या किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना हृदयविकाराच्या सौम्य लक्षणांबद्दल माहिती नाही. यामुळेच छातीत किंचित दुखणे किंवा कमी कालावधीच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. ते याचं कारण अपचन, किंवा छातीत जळजळ सुरु होते.
'ही' लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा कोणाला पोटाच्या वरच्या किंवा छातीच्या मध्यभागी 20-25 मिनिटे तीव्र वेदना होत असतील, तेव्हा विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ECG चाचणी करावी. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, धूम्रपान, बदलती जीवनशैली अशा लोकांना याचा अधिक धोका असतो. हे अनुवांशिक देखील असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :