मावळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मावळ लोकसभेत सभा (Maval Lok Sabha constituency) घेतायेत, एका अर्थाने ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या (Shrirang Barne)प्रचाराचा शुभारंभचं करतायेत. असं असलं तरी अजित पवार (Ajit pawar) गटातील आमदार सुनील शेळकेंनी (sunil shelke) बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार सुनील शेळकेंनी मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ साठी शेळके हा आग्रह करतायेत, अशी चर्चा यानिमित्ताने रंगलीये. सुनील शेळके सुद्धा पार्थच्या चर्चांना स्पष्टपणे नाकारत नाहीत. "दादा म्हणतील तसं" असं म्हणत शेळके खासदार बारणेंना सूचक इशारा दिलाय. महायुती म्हणून फक्त राष्ट्रवादीनेच नैतिकता सांभाळायची का? बारणेंना उमेदवारी देऊन तुम्ही जनतेला गृहीत धरताय का? असे प्रश्न उपस्थित करत बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपने विचार करावा, असं म्हणत शेळकेंनी बारणेंना उमेदवारी न देण्याचा इशारा दिलाय. 


आमदार सुनील शेळके काय म्हणाले ?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा जानेवारीला मावळ मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेणार आहेत, म्हणजेच एका अर्थाने विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. दुसरीकडे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी या मतदारसंघावर दावा केलाय. हा तिडा कसा सुटणार? यावर बोलताना शेळके म्हणाले की, संपूर्ण राज्यांमध्ये आणि देशांमध्ये आता लोकसभेचा सुरू होती येणाऱ्या फेब्रुवारी मार्चमध्ये साधारणता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.  म्हणून प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने मतदार संघ ताब्यात राहण्याकरता पक्षाचे प्रमुख जे कोणी पदाधिकारी आहेत किंवा नेते आहेत ते त्या पक्षाच्या सभा घेण्याचा प्रयत्न करतात. मी मागील काय दिवसापूर्वी मावळ लोकसभेच्या संदर्भात स्पष्टपणे माझी भूमिका मांडली होती आणि आजही त्या भूमिकेवरती मी ठाम आहे. मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे, जेणेकरून पिंपरी चिंचवड असेल मावळ असेल उरण असेल किंवा इतर मतदारसंघात या मतदारसंघावर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक चांगली पकड आहे. मानणारा वर्ग देखील आहे.  म्हणून माझी मागणी आजही आहे येणाऱ्या काळामध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालाच पाहिजे.  याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की आज राज्याचे प्रमुख सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मावळ लोकसभेच्या संदर्भात जरी त्यांनी त्या ठिकाणी सभा घेत असले तर त्यांच्या पक्षाचा तो अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे. परंतु महायुती म्हणून आम्हीच फक्त नैतिकता जपायची, सांभाळायची, पक्ष संघटना जो निर्णय दिला त्या निर्णयाची ठांब राहून काम करायचं, हे आम्ही ठरवलं तरी इथल्या जनतेने देखील ते ठरवलं पाहिजेल. म्हणून नागरिकांना गृहीत न धरता  पुन्हा विचार केला पाहिजे. 


नऊ वर्षांमध्ये विद्यमान खासदारांनी काय केलं ?


मावळ लोकसभेची जागा देत असताना फक्त देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नावावरती, यांच्या करिष्मा वरती जनता मतदान करील आणि आपण पुन्हा खासदार होऊ. अशा पद्धतीने उमेदवारी न देता इथल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पहिले समजून घ्यायला पाहिजेत. त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात.  मागील नऊ वर्षांमध्ये विद्यमान खासदारांनी काय केलं हे जनतेपुढे मांडावे हेच माझं म्हणणं आहे.


पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल का?


पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी का? यावर बोलताना शेळके म्हणाले की, निर्णय घेणार्‍या भूमिकेतला मी अजिबात नाही.  निर्णयच्या प्रक्रियामध्ये माझा कुठलाही संबंध नाही. परंतु पक्षश्रेष्ठ उमेदवार देईल त्याच्यामागे आम्ही खंबीर पणे उभा आहे. ज्यावेळेला मावळ लोकसभा निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंत मावळ तालुक्यातला खासदार आम्ही पाहिला नाही. त्यामुळे आमच्या तालुक्यातील खासदार व्हावा, असे वाटतेय. 


दगड उभा केला तरी तो निवडून येणार


मावळ लोकसभेच्या जागेवरती महायुतीचा दगड उभा केला तरी तो निवडून येणार आहे. पण जनतेला गृहित धरु नका, असे सुनील शेळके म्हणाले. बारणे आप्पांशी माझं काही व्यक्तिगत वैर नाही, असेही शेळके म्हणाले.