Health Tips : गुलाबी थंडीचा असा हिवाळा (Winter Season) हा महिना सुरु झाला आहे. इतर ऋतूंच्या मानाने हिवाळा ऋतू हा तसा आळशी ऋतू मानला जातो. कारण, या ऋतूत आपल्याला सर्वात जास्त झोप लागते. तसेच, थंडीत भूकही जास्त लागते. असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यासाठी लोक हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यापैकीच एक म्हणजे मेथी (Fenugreek). उत्तर भारतातील बहुतांश भागात लोक मेथीची पाने खूप आवडीने खातात. अनेक ठिकाणी मेथीचे पराठेही खाल्ले जातात. सकाळचा चहा आणि मेथीचे पराठे एकत्र खायला देखील अनेकांना आवडते. 

  


पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, शरीरासाठी उत्त्म मानली जाणारी मेथी तुमच्या आरोग्याचं नुकसानही करू शकते. मेथीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि घटक असतात. पण, काही वेळा मेथी खाणे टाळावे. मेथीचे नेमके दुष्परिणाम कोणते याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.   


मधुमेही रूग्णांसाठी नुकसानकारक 


मेथी फक्त पचन सुधारत नाही तर साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवते. मधुमेहाच्या रुग्णांनी मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. तज्ज्ञांच्या मते, मेथीचे दाणे किंवा हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात घेतल्यास साखरेची पातळी झपाट्याने खाली जाऊ शकते. खरंतर, मेथीतील पोषक घटक रक्तातील साखर कमी करतात, म्हणूनच ते फक्त मर्यादेतच सेवन केले पाहिजे.


उच्च रक्तदाब असलेले रुग्ण


मेथीचे खाणे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. कारण मेथी जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते आणि ही चूक रक्तदाब कमी करू शकते. त्यामुळे जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर मेथीसारख्या पदार्थांचे सेवन टाळा.


गर्भधारणेदरम्यान खाणे टाळा


मेथीचा प्रभाव उष्ण की थंड असा संभ्रम आहे. मेथी गरम असते असे बहुतेक लोक मानतात, त्यामुळे गर्भधारणेदरम्यान त्याचे सेवन टाळावे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गरोदरपणात याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्त गोठण्याची समस्या देखील होऊ शकते. हिवाळ्यातही मेथीपासून तयार केलेले पदार्थ कमी खावेत.


पचनमध्ये समस्या


जर कोणाला पचनाचा त्रास असेल तर त्यांनी मेथीची भाजीही खाऊ नये. कारण त्यामुळे अधिक गॅस तयार होतो. याशिवाय भाजी बनवताना हिरव्या मिरच्यांचा वापर केला जातो. ज्यांना अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी अशा भाज्यांपासून दूर राहावे. खाण्याच्या या चुकीमुळे छातीत जळजळ आणखी वाढते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहापासून दूर राहण्यासाठी केवळ मिठाईच नाही तर 'या' गोष्टींवरही नियंत्रण ठेवा; निरोगी आरोग्यासाठी रामबाण उपाय