Health Tips : आपल्यापैकी अनेकांच्या घरात अंडी (Eggs) खाल्ली जातात. अंड्यांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, कोलीन, लोह आणि फोलेट यांसारखे अनेक पोषक घटक असतात. दररोज अंडी खाल्ल्याने शरीराला विविध फायदे मिलतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण, अंडी खाल्ल्याने आपला शारीरिक विकासही होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) नुसार अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असते असं सांगण्यात आलं आहे. 


अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असते?


कोलेस्ट्रॉलचे दोन मुख्य प्रकार म्हणजे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्ट्रॉल आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल). एलडीएल कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा 'चांगले' कोलेस्ट्रॉल कमी धोकादायक आहे. कोलेस्ट्रॉल हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीचे संरक्षण करते. अंडी हे आहारातील कोलेस्ट्रॉलने समृद्ध असले तरी ते अनहेल्दी नसतात. ते ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स सारख्या पदार्थांमध्ये असलेल्या कोलेस्ट्रॉलपेक्षा वेगळे असतात. 


संशोधनात असेही आढळून आले आहे की, अंडी खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत नाही किंवा हृदयविकाराचा धोका वाढत नाही. न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 2018 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अंड्यांचा एचडीएल फंक्शन आणि लिपोप्रोटीन कण प्रोफाईलवर सकारात्मक प्रभाव पडतो. 


मधुमेही रुग्णांनी इतकी अंडी खाऊ नयेत


कॅनेडियन जर्नल ऑफ डायबिटीजमध्ये प्रकाशित केलेल्या लेखानुसार, दर आठवड्याला 6-12 अंडी खाल्ल्याने टाईप 2 मधुमेही रूग्णांना किंवा मधुमेहाचा धोका असलेल्या रूग्णांवर परिणाम होतो. विशेष म्हणजे, काही अभ्यासांमध्ये अंड्याच्या सेवनाने चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढल्याचे आढळून आले.


अंडी पोषक तत्वांनी समृद्ध असतात, प्रत्येक मोठ्या अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये साधारण 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. वैयक्तिक आरोग्य, आहारातील गरजा आणि एकूण कॅलरी सेवन यावर अवलंबून अंड्याचा वापर बदलतो. 


कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी इतकी अंडी खाऊ नयेत


कोरियन जर्नल ऑफ फूड सायन्स अँड अ‍ॅनिमल रिसोर्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, दर आठवड्याला 2-7 अंडी खाल्ल्याने एचडीएल कोलेस्ट्रॉल उच्च पातळी राखण्यात मदत होते आणि चयापचय सिंड्रोमचा धोका कमी होतो, जे दररोज 2 किंवा अधिक होते. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या