Red Grapes For Kidney : किडनीचा (Kidney) त्रास हा एक गंभीर आजारांपैकी एक आहे. जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचे एकंदर आरोग्य (Health) चांगले राहते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्याचे कार्य सुधारण्यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आहाराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर किडनीच्या आरोग्यासाठी लाल द्राक्षे (Red Grapes) वरदानापेक्षा कमी नाहीत. किडनीशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या लाल द्राक्षाच्या सेवनाने दूर होऊ शकतात. खरंतर, किडनीचे रुग्ण त्यांच्या आहारात सुधारणा करून अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकतात. किडनीच्या रुग्णांसाठी लाल द्राक्ष कशी उपयोगी आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


लाल द्राक्षे किडनीसाठी फायदेशीर का आहेत?


व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्सचा स्रोत


द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्स मूत्रपिंडाच्या आजाराची प्रगती रोखण्यास आणि हृदयरोग, मधुमेह आणि इतर अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. सुमारे अर्धा कप 75 ग्रॅम द्राक्षांमध्ये 1.5 मिलीग्राम सोडियम, 144 मिलीग्राम पोटॅशियम, 14 मिलीग्राम फॉस्फरस आणि 0.5 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे ते फायदेशीर मानले जातात.


किडनीच्या रुग्णांनी द्राक्षे कशी खावीत


1. NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, द्राक्ष पावडरचे सेवन किडनीच्या रुग्णांसाठी चांगले असल्याचे आढळून आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्राक्षांचे सेवन करावे. 
2. लाल द्राक्षे स्नॅक्स आणि सॅलड म्हणून खाऊ शकतात.
3. लाल द्राक्षे वेगवेगळ्या पदार्थांतून तुम्ही खाऊ शकता.


किडनीच्या रुग्णांनी 'अशी' काळजी घ्यावी


किडनीचे रुग्ण खास आहाराचे पालन करून ही समस्या टाळू शकतात. डॉक्टरही किडनीच्या रूग्णांना योग्य आहाराचा सल्ला देतात. तसेच, तुमच्या किडनीचे किती नुकसान झाले आहे. किडनी किती खराब झाली आहे यावर देखील अवलंबून असते. त्यामुळे किडनी तज्ज्ञ आणि आहारतज्ञ यांच्या सल्ल्याने डाएट चार्ट बनवून त्याचे पालन करणे चांगले आहे. हे रक्तातील घाण कमी करून किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करते.  


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय