Pomegranate Peel Benefits : पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असणारं डाळिंब (Pomegranate) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहे. तुम्हाला जर रक्त वाढवायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये डाळिंबाचा नक्की समावेश करा असं म्हटलं जातं.डाळिंबाचे दाणे, बी आणि डाळिंबाचा रस अशा प्रत्येक घटकाचा आपल्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. तुमचं रक्त शुद्ध करण्यासाठी तसेच, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राखण्यासाठी डाळिंब फार गुणकारी आहे. पण, हे डाळिंबाच्या बाबतीत आहे. तुम्हाला आता हे जाणून आश्चर्य वाटेल की डाळिंबा प्रमाणेच डाळिंबाच्या सालीही आरोग्यासाठी फार गुणकारी आहेत. 

Continues below advertisement

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून सुटका मिळवण्यापासून ते तजेलदार त्वचेपर्यंत डाळिंबाच्या साली फाय फायदेशीर आहेत. आपण सर्वच या साली कचरा म्हणून फेकून देतो पण या साली एन्टीऑक्सिडेंटने परिपूर्ण आहेत. आयुर्वेदातही डाळिंबाच्या सालीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. 

डाळिंबाच्या सालीचे आश्चर्यकारक फायदे 

डाळिंबाच्या साली या त्याच्या फळाप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. यामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. पोषण तत्त्वांच्या म्हणण्यानुसार, शरीरात ऑक्सीडेटिव्ह तणाव हा नेहमीच धोकादायक असतो. जर तुम्ही याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका जास्ता वाढू शकतो. डाळिंबाच्या सालीत पॉलिफेनोल्स आणि फ्लेवोनोईड्स यांसारख्या एन्टीऑक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त असतं. हे घटक शरीरातील सूज आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 

Continues below advertisement

सूज कमी करण्यास उपयुक्त 

डाळिंबाच्या सालीत उपलब्ध असणारे एन्टीऑक्सिडेंट सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच, हे क्रॉनिक सूजशी संबंधित परिस्थितीशी जुळण्यास मदत करतात. 

हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर 

डाळिंबाच्या साली हृदयाच्या आरोग्यावर फार सकारात्मक प्रभाव टाकतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी हे फार उपयुक्त आहे. 

त्वचेसाठी गुणकारी 

डाळिंबाच्या सालीत उपलब्ध असणारे एन्टीऑक्सिडेंट्स यूवी किरणांपासून नुकसान होण्यापासून वाचवतात. 

डाळिंबाच्या सालीचा कसा वापर कराल? 

तुम्हाला जर डाळिंबाच्या सालीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याचा विविध प्रकारे उपयोग करू शकता. या ठिकाणी आम्ही तुम्हाला डाळिंबाच्या सालीची पावडर कशी कराल याचा सोपा मार्ग सांगणार आहोत. 

1. डाळिंबाचे दाणे सोलून काढल्यानंतर त्याच्या साली वेगळ्या करा. 2. या सालींना कमीत कमी 2 चे 3 दिवसांसाठी किंवा जोपर्यंत त्या पूर्णपणे सुकत नाहीत तोपर्यंत उन्हात वाळवा. 3. या सुकलेल्या सालींना ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये घालून जोपर्यंत त्याची पावडर होत नाही तोपर्यंत बारीक करा. 4. आता या पावडरला तुमच्या खोलीच्या तापमानावर हवाबंद डब्यात ठेवा. तुम्ही ही पावडर ज्यूस, शेक किंवा स्मूदी बरोबर सुद्धा घेऊ शकता. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर