Migraine Symptoms : साधारणपणे सर्वांनाच डोकेदुखीचा त्रास हा प्रत्येकालाच जाणवतो. मात्र, अनेकजण तीव्र डोकेदुखीचा त्रास झाल्यास औषध घेतात. असे काही लोक आहेत जे दररोज होणाऱ्या सौम्य डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतात. चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे किंवा मान दुखणे ही देखील मायग्रेनची (Migraine) सुरुवातीची लक्षणे असू शकतात. डोकेदुखीला किरकोळ समस्या समजू नका कारण नंतर हा त्रास मायग्रेन असू शकतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला मायग्रेनची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत आणि तुम्ही घरच्या घरी हा त्रास होण्यापासून कसा थांबवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सौम्य डोकेदुखी ही मायग्रेनची सुरुवात नाही
सतत डोकेदुखीचा त्रास होणे ही एक गंभीर समस्या असू शकते. मात्र, मायग्रेनच्या वेदना फार तीक्ष्ण असतात. आणि त्यांना कंट्रोल करणं जवळपास कठीण असतं. ही वेदना सतत काही तास टिकते किंवा अनेक दिवस टिकते. या वेदनेचे वैशिष्ट्य म्हणजे उलट्या होणे, अस्वस्थता, भूक न लागणे अशा समस्या आहेत. या डोकेदुखीत चक्कर येण्यासारखी स्थितीही जाणवते. तुम्हालाही अशीच लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. मायग्रेन जास्त वाढू नये, म्हणूनच डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे.
'ही' लक्षणे जाणून घ्या
कधीकधी भूक लागल्यानेही डोकेदुखीची समस्या जाणवू लागते. किंवा जास्त उन्हामुळेदेखील हा त्रास होतो. तसेच, झोप पूर्ण न झाल्यानेही डोकेदुखी होते. जर तुम्हाला डोकेदुखीच्या वेदना जाणवत असतील तर नियमितपणे ध्यान करा. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी औषधे घ्या. पुरुषांपेक्षा स्त्रियांना मायग्रेनचा जास्त प्रमाणात धोका असतो. म्हणूनच महिलांनी नियमित व्यायाम करणे आणि शक्य तितकी सकारात्मक ऊर्जा घेणे महत्त्वाचे आहे.
योगामुळे शरीर तर निरोगी राहतेच, पण तुमचे मनही निरोगी राहते. योगासने केल्याने मनाला आराम मिळेल. दररोज योग, ध्यान आणि प्राणायाम करा, यामुळे तणाव आणि मायग्रेन दोन्हीमध्ये आराम मिळेल. जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा तुमची आवडती गोष्ट करा. कोमट पाण्याने आंघोळ करा, यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.