Uday Samant on Uddhav Thackeray MLA : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी कोणत्याही आमदारांना अपत्र ठरवलं नाही. पण शिवसेना एकनाथ शिंदे (Shiv sena Eknath Shinde) यांचीच असल्याचा निर्णय दिला. राहुल नार्वेकरांच्या या निर्णायानंतर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडून टीकास्त्र सोडण्यात आले. पण एकनाथ शिंदे (Shiv sena Eknath Shinde) यांच्या नेत्यांकडून याचं कौतुक केलं. उद्योग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा दावा सामंतांनी केला आहे. रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. 


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत. 14 तारखेपासून काय होतंय ते पाहा, असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. यावेळी त्यांनी मिलिंद देवारा यांच्या पक्षप्रवेशावरही मत व्यक्त केले. 


मिलिंद देवरा शिवसेनेत येणार का? 


मिलिंद देवरा यांच्यासाऱख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर  मुंबईत शिवसेना भक्कम होईल. त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांच्या विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा. सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल, असे उदय सामंत म्हणाले. मिलिंद देवरा लोकांमध्ये जावून काम करणारे नेतृत्व आहे. मुरली देवरा साहेबांचा त्यांना वारसा आहे. अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात, असेही सामंत म्हणाले. 


महाविकास आघाडीवर हल्लाबोल - 


ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही. पहिले त्यांनी पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करावा. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 10 ते 20 टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा. हे सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानांचा चेहरा नाही, असे उदय सामंत म्हणाले. 


श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक करतील -


कोणी किती श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात गेले तरी त्यांना धोका नाही..ते विजयाची हॅट्रिक करतील, असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला. 


आणखी वाचा :


Majha Katta : यामध्ये शिंदेंची काहीच भूमिका नाही, हे सगळं भाजपचं काम, माझा कट्ट्यावर अनिल परबांचा थेट वार  


Majha Katta : भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही, तो मान्यही करणार नाही,  अनिल परब यांनी स्पष्टचं सांगितलं