Health Tips : तुम्हालाही पाठीच्या खालच्या भागाच्या दुखण्याचा त्रास आहे का? जर असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सावध राहा. कारण हे सामान्य दुखणे नसून अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. खरंतर, बरेच लोक या प्रकारच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत राहतात. त्यांना असे वाटते की, बसण्याच्या किंवा झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ही वेदना होत आहे आणि काही वेळाने ती स्वतःच बरी होईल परंतु प्रत्येक वेळी असे होणे शक्य नाही. काही वेळा हा पाठदुखीचा त्रास खूप धोकादायक असू शकते आणि गंभीर रोगांचे रूप देखील घेऊ शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास समस्या वाढू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या आजारांमुळे पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते. पाठदुखीची कारणे नेमकी कोणती? संधिवात

संधिवातामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात. खरंतर, संधिवातामुळे पाठीचा कणा आकुंचन पावू लागतो. वैद्यकीय भाषेत त्याला स्पाइनल स्टेनोसिस म्हणतात. ही वेदना एखाद्याला मोठ्या प्रमाणात त्रास देऊ शकते. यामुळे व्यक्ती नीट काम करू शकत नाही आणि आरामही करू शकत नाही. त्यामुळे वेळ न दवडता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.   ऑस्टिओपोरोसिस

ऑस्टियोपोरोसिस हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. यामध्ये पाठीच्या खालच्या भागात असह्य वेदना होतात. यामुळे हाडे हळूहळू पोकळ होऊ लागतात आणि पाठदुखी वाढू लागते. अशा परिस्थितीत कधीही गाफील राहू नये. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेऊ शकता. त्यामुळे वेळ न दवडता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.   डिस्कची समस्या

कधीकधी डिस्क खराब होणे देखील वेदनादायक असू शकते. डिस्क स्वतः मणक्याच्या हाडांमधील शरीराचे संतुलन राखण्याचे काम करते. जेव्हा डिस्कच्या आतील उपास्थि फुगायला लागते, तेव्हा ती फुटण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तेथे असलेल्या मज्जातंतूवर दबाव निर्माण होतो आणि त्यामुळे फुगवटा किंवा चकती फुटल्याने पाठदुखीची समस्या उद्भवते. अशा स्थितीत सतत वेदना होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Heath Tips : तुमचे डोळे वारंवार कोरडे होतायत का? असू शकतात 'या' आजाराची लक्षणं; वेळीच 'या' सोप्या टिप्स फॉलो करा