मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा दिवस 'ब्लॅक मंडे' ठरला असून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1172 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 302 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,166 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,173 वर पोहोचला आहे. आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. 


FMGC क्षेत्रातील कंपन्या सोडल्या तर इतर सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स चांगलेच आपटले आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका हा आयटी क्षेत्राला बसला असून त्याच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांची घसरण झाली आहे. तर रिअॅलिटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये एका टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. 


आज 1454 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1990 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 135 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, एफएमजीसी आणि उर्जा या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचं दिसून आलं.BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


सोमवारी शेअर बाजारात Infosys, HDFC, HDFC Bank, Tech Mahindra आणि Apollo HospitalsL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  NTPC, SBI Life Insurance, HDFC Life, Coal India आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.



या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • NTPC- 6.07 टक्के

  • SBI Life Insurance- 2.20 टक्के

  • HDFC Life- 1.67 टक्के

  • Coal India- 1.53 टक्के

  • Tata Steel- 1.49 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Infosys- 7.39 टक्के

  • HDFC- 4.79 टक्के

  • HDFC Bank- 4.59 टक्के

  • Tech Mahindra- 4.51 टक्के

  • Apollo Hospital- 3.89 टक्के


महत्वाच्या बातम्या: