Nail Biting Side Effects : अनेकदा घरात नखे चावल्याबद्दल आपल्याला घरच्यांकडून ओरडले जाते. कारण नखं चावणं ही वाईट सवय आहे. खरंतर, नखे चावण्याची सवय तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. नखे चावणे ही अशी सवय आहे, जी थांबवणे खूप कठीण आहे. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, जगातील 30 टक्के लोकांना नखे ​​चघळण्याची सवय आहे. या सवयीमुळे होणारे नुकसान आणि यापासून सुटका कशी करावी हे जाणून घेऊयात.


नखे चावणे ...यासाठी धोकादायक आहे


बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका


नखे चावल्यावर नखांमध्ये जमा झालेले बॅक्टेरिया तोंडातून शरीरात पोहोचतात आणि पॅरोनीचिया नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. हा संसर्ग हळूहळू शरीरात पसरतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. याचा आणखी एक तोटा असा आहे की या संसर्गामध्ये नखांमध्ये पू भरतो आणि संसर्गामुळे ते सुजतात. यावर वेळीच उपचार न केल्यास ताप, अंगदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना याचा धोका अधिक असतो.


नखांची नैसर्गिक वाढ थांबू शकते


तुम्हाला नखे ​​वारंवार चावण्याची सवय असेल तर त्यांची नैसर्गिक वाढ थांबू शकते. नखे वारंवार चघळल्याने त्यांच्या वाढीच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते. यामुळे नखांची वाढ होणे थांबू शकते.


फंगल इन्फेक्शन होऊ शकते


नखे चघळल्याने त्यामध्ये जमा झालेली बुरशी तोंडाद्वारे शरीराच्या इतर भागात पोहोचते आणि त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.


दात दुखू शकतात


नखे चावल्याने दात कमकुवत होऊ शकतात. यामुळे हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव किंवा दात देखील दुखू शकतात म्हणूनच नखे चावू नयेत.


आतड्यांचं नुकसान होऊ शकते


नखे चघळल्याने त्याची घाण शरीरात पोहोचते आणि त्याचा परिणाम पचनसंस्था आणि चयापचयावर होतो. त्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.


नखे चावण्याची सवय थांबवण्यासाठी टिप्स


1. जर तुम्हाला तुमची नखे चावण्याची वाईट सवय सोडायची असेल तर तुम्ही माउथ गार्डची मदत घेऊ शकता.
2. तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक खूप तणावाखाली असताना नखे ​​चावतात.
3. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या नखांवर कडुलिंबाचा रस लावू शकता. यामुळे तोंडात नखे घातल्याने कडूपणा येईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 8 तास झोप घेऊनही दिवसभरात झोप येते? असू शकतात हायपरसोमनियाची लक्षणं; वेळीच सावध व्हा