Health Tips : आपल्या आहारातील सॅलड (Salad) हे आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. या सॅलडमध्ये अनेक प्रकारच्या हेल्दी भाज्या (Vegetables), फळांचा (Fruits) जसे की, टोमॅटो, कांदा, कोबी, ब्रोकोली, काकडी, झुकीनी अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश ग्रीन सॅलडमध्ये केला जातो. या सर्व पदार्थांमध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. कॅलरीज कमी असल्याने शरीराचे वजन वाढत नाही. आहारात या सॅलडचा समावेश करून लठ्ठपणा सहज कमी करता येतो. याचीच चव वाढवण्यासाठी यामध्ये मीठ (Salt) आणि लिंबूचा (Lemon) वापर करून सॅलड तयार केलं जातं. पण, सॅलडमध्ये लिंबू आणि मिठाचा वापर आरोग्यासाठी फार घातक आहे. याचं कारण म्हणजे मिठात सोडियम असते आणि जेवणात जास्त मीठ खाल्ल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. सॅलडमध्ये पांढरे मीठ टाकून ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. 

सॅलडमध्ये मिठाचा वापर करावा का?

सॅलडवर मीठ टाकून ते खाल्ल्याने शरीरातील सोडियमची पातळी वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. तसेच, जेवणात कधीही मिठाचा वापर मीठ घालून करू नये असा सल्ला अनेकदा डॉक्टर करतात. सॅलडमध्ये वरून मिठाचा वापर केल्याने रक्तदाब वाढू शकतो. एवढेच नाही तर, तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू शकते.  तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. 

सॅलडमध्ये मीठ खाण्याचे तोटे

सॅलडवर मीठ खाल्ल्यास पाचक एन्झाईम्स खराब होतात. यामुळे तुमच्या पचनक्रियेवरही परिणाम होतो. यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता देखील होते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रासही होतो. उच्च रक्तदाब वाढणे, झोप न लागणे आणि अस्वस्थता यांसारखी लक्षणं तुम्हाला दिसू लागतात. 

सॅलडमध्ये कोणते मीठ वापरावे?

पांढऱ्या मिठामुळे होणारे नुकसान टाळायचे असेल तर सॅलडमध्ये काळे मीठ आणि सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) या मिठाचा वापर करावा. या दोन्ही प्रकारच्या मिठात सोडियम कमी प्रमाणात असते. तसेच, हे मीठ चवीनुसार छान लागतात. हे मीठ गॅस आणि अॅसिडिटीवरही चांगले मानले जाते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल