Health Tips : सध्याच्या काळात बारीक होण्याचे, वजन कमी करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. मात्र, बारीक होण्याच्या एका टिप्समध्ये, आजकाल ज्याचा उल्लेख केला जात आहे तो म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting). इंटरमिटंट फास्टिंगमुळे अनेकांना चांगले रिझल्ट्सही मिळाले आहेत. तर काहींच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. इंटरमिटंट फास्टिंग केल्याने लोकांमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी जागरुकता निर्माण झाली आहे, तर, त्याचे दुष्परिणामही लोकांसाठी त्रासाचं कारण झालं आहे. यामुळे तुमच्या शरीरात याचे काही परिणाम जाणवू लागतात.
इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?
वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आजकाल इंटरमिटंट फास्टिंग करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. इंटरमिटंट फास्टिंग करण्याचा एक नमुना आहे ज्यामध्ये 14-16 तास उपवास केला जातो. यामुळे वजन कमी करणे नक्कीच सोपे आहे. परंतु, उलट्या, चक्कर येणे, आळस, अशक्तपणा यांसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागते.
बराच वेळ शरीराला अन्न न मिळाल्याने मळमळ होऊ शकते. यासोबतच शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता देखील दिसून येते. इंटरमिटंट फास्टिंग करताना मळमळ का येते ते जाणून घेऊयात.
'या' समस्यांचा सामना करावा लागतो
1. डोकेदुखी आणि मळमळ होणे : इंटरमिटंट फास्टिंग हा एक शब्द आहे जे लोक खाण्याच्या पद्धती म्हणून वापरतात. ज्यामध्ये उपवास नियमितपणे ठेवला जातो. हेल्थलाइनच्या मते, इंटरमिटंट फास्टिंग करताना वजन कमी करण्याच्या नादात लोक खूप कमी खातात. इंटरमिटंट फास्टिंग करताना डोकेदुखी आणि मळमळ होणे हे सामान्य आहे. मात्र. वारंवार तुम्हाला या समस्यांचा सामना केल्यास ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
2. पचनाच्या समस्या वाढतात : इंटरमिटंट फास्टिंग करताना अनेक प्रकारच्या पचनाच्या समस्या वाढतात. बद्धकोष्ठता, अतिसार, मळमळ आणि ओटीपोटात सूज यांसारख्या समस्या सामान्यतः लोकांना त्रास देतात. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे या पचनाच्या समस्या वाढतात. अधूनमधून उपवास करताना हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे. तसेच फायबर युक्त अन्नाचा आहारात समावेश करावा. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि मळमळ कमी होते.
3. चक्कर आणि लो एनर्जी : इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्या लोकांना थकवा आणि कमी एनर्जीचा सामना करावा लागू शकतो. इंटरमिटंट फास्टिंग केल्याने रक्तातील साखर कमी झाल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. यासोबतच काही लोकांना उपवासामुळे अपुऱ्या झोपेचाही सामना करावा लागतो, त्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि मळमळणे यांसारखे त्रास तुम्हाला होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :
Health News : सावधान! पॅकेजमधील अन्नपदार्थांमुळे वाढतोय मृत्यूचा धोका, संशोधनातून उघड