How to Lose Face Fat : वजन जास्त असेल तर अनेक लोक डाएट प्लॅन करतात. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. चेहऱ्यावरील चरबीकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात.  चेहऱ्यावर दिसणारी चरबी म्हणजेच फेस फॅटमुळे डबल चिनची समस्या जाणवू शकते.  चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतेही डाएट करण्याची किंवा जिम लावण्याची गरज नाही. या टिप्स फॉलो करून तुम्ही चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता. 


या टिप्स फॉलो करा
1.चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर डाएटमध्ये काही बदल करा. डाएटमध्ये सोडिमचे प्रमाण कमी करा. तसेच रोज फेशियल योगा करा. 
2. भरपूर पाणी प्यायल्यानं देखील फेस फॅट कमी होतो. डाएटमध्ये प्रोटिन आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. 
3. धुम्रापान केल्यानं देखील चेहऱ्यावर चरबी वाढते. त्यामुळे धुम्रपान करणं टाळा. 
4.मुलतानी मिट्टीचा फेस पॅक अठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावा.   


फेशियल योगा करा-
फेशियल योगा हा चेहऱ्याचा मसाज आणि व्यायमाचा प्राकार आहे. हा योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा उत्तेजित होते. तसेच या योगाने  तणाव आणि चिंता कमी होते.चेहऱ्याचे स्नायू मऊ देखील होतात. काही संशोधनामधून असे स्पष्ट झाले आहे की, फेशियल योगामुळे त्वचा उजळ होते. फेशियल योगाचे अनेक मानसिक आणि शारिरीक फायदे आहेत.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha