Health Tips : आजकाल बहुतेक लोक आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. बिघडलेली जीवनशैली आणि आहारामुळे अनेक लोक लठ्ठ होत आहेत. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारे प्रयत्न करतात. काही जण जिमला जातात, तर काही नियमित आहाराचं पालन करतात. पण आपल्यामध्ये असे अनेक आहेत जे आपल्या बारीक शरीरामुळे त्रस्त आहेत. वजन वाढवण्यासाठी, आहारात उच्च कॅलरीयुक्त अन्न समाविष्ट करणे चांगले आहे.
पण तुमचे वजन का कमी होत आहे हे समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. याचं मुख्य कारणे म्हणजे कोणत्याही आजारातून बरे होणे किंवा वाढत्या वयानुसार वजन कमी होणे. जर तुम्हाला तुमचे वजन हेल्दी पद्धतीने वाढवायचे असेल तर तुम्ही यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
वजन कसे वाढवायचे?
निरोगी मार्गाने वजन वाढवण्यासाठी, आपण आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या आहारात उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन वाढवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा 300-500 जास्त कॅलरी वापरल्या पाहिजेत. उच्च उष्मांकयुक्त पदार्थांमध्ये चरबी आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवा.
जंक फूड खाऊ नका
वजन लवकर वाढवण्यासाठी अस्वास्थ्यकर चरबीयुक्त पदार्थ आणि जंक फूड खाऊ नका. अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन केल्याने तुमच्या पोटाचा भाग वाढतो. याशिवाय, हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे भविष्यात मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. वजन वाढवण्यासाठी तांदूळ, दूध, ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश करा.
झोप देखील महत्वाची आहे
वजन वाढवण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबरच पुरेशी झोपही महत्त्वाची आहे. त्यामुळे दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. शिवाय, ते तुमच्या मानसिक विकासासाठी देखील चांगले राहील. याबरोबरच वर्कआउट्सही करायला हवेत. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला अधिक भूक लागते. ज्यामुळे तुम्ही अधिक अन्न खाता. यामुळे तुमचे वजन हेल्दी पद्धतीने वाढू शकते. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन नक्की वाढेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :