Mayonnaise : पांढऱ्या रंगाचं आणि गोड चवीचं मेयोनीज (Mayonnaise) खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फास्ट फूड बनवताना सँडविच, पिझ्झा, पास्ता, बर्गर यांसारख्या अनेक पदार्थांत मेयोनीजचा अगदी सर्रास वापर केला जातो. मेयोनीज खायला देखील फार टेस्टी असल्या कारणाने तरूणाईत याची प्रचंड क्रेझ आहे. पण, मेयोनीजचं अतिसेवन केल्याने आपल्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं हे फार कमी लोकांना माहित आहे.


मेयोनिजची चव जरी चांगली असली तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण मेयोनिजमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा किती प्रमाणात वापर केला जातो? आणि त्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


मेयोनीज कसे बनवले जाते?


मेयोनीज अंडी, तेल आणि व्हिनेगरपासून बनवलं जाते. एका मेयोनिजमध्ये साधारण 80 टक्के तेलाचा वापर केला जातो. याचाच अर्थ त्यात 80 टक्के फॅट असतं. एकूणच, मेयोनीज हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनो सॅच्युरेटेड तसेच ट्रान्स फॅट असतं. अॅपल सायडर व्हिनेगरबरोबर, अंड्यातील पिवळा बलक आणि लिंबाचा रस देखील मेयोनिजमध्ये वापरला जातो.
 
अनेक ठिकाणी त्यात सोया दुधाचा देखील वापर केला जातो. पण, एकंदरीत विचार केला तर मेयोनिज हे सॅच्युरेटेड फॅटने समृद्ध आहे आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण, जर आपण फॅट आणि कॅलरीजबद्दल बोललो तर मेयोनिजमुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणा वाढतो आणि हृदयासाठी देखील मेयोनीज योग्य नाही. पण, मेयोनीजबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे त्यात भरपूर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते.   


एक चमचा मेयोनीजमध्ये काय आहे?


जर आपण 100 ग्रॅम मेयोनीज बद्दल बोललो तर त्यात 700 कॅलरीज असतात. याचाच अर्थ, जर तुम्ही एकाच वेळी 100 ग्रॅम मेयोनीज खाल्ले तर तुम्ही एका वेळी 700 कॅलरीज वापरत आहात. एक चमचा मेयोनिजमध्ये 90 ते 100 कॅलरीज आणि 10 ग्रॅम फॅट असते. जर एखाद्या व्यक्तीने दिवसातून एक चमचा मेयोनीज खाल्ले तर त्याच्या शरीरात दिवसातून पाच ग्रॅम कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. 


मेयोनिजमध्ये किती प्रमाणात तेलाचा वापर होतो? 


एक चमचा वनस्पती तेलात 40 कॅलरीज असतात. याचाच अर्थ असा की, तुम्ही अडीच चमचे तेल एक चमचा मेयोनिजच्या रूपात खात आहात. प्रत्येक चमचा मेयोनिजमध्ये सुमारे 90 ग्रॅम सोडियम असते जे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही मेयोनीजचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर तुमच्या शरीरातील फॅट, कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि कॅलरीज जास्त प्रमाणात वाढू शकतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Joint Pain : थंडी वाढताच जुनं दुखणं डोकं वर काढतं, यामागचं खरं कारण माहित आहे का?