Home Remedies For Snoring : घोरणे (Snoring) हा असा एक कर्कश आवाज आहे जी तुमच्या घशातील श्वासनलिकेतून हवा जाते. ज्यामुळे तुम्ही श्वास घेता तेव्हा ऊती कंप पावतात. आपल्यापैकी अनेकांना घोरण्याची सवय असते. पण, काही लोकांसाठी ही समस्या असू शकते. कधीकधी हे गंभीर आरोग्य स्थितीचे लक्षण देखील असू शकते. यासाठी तुमच्या जीवनशैलीत (Lifestyle) बदल करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला देखील घोरण्याची समस्या असेल तर काही घरगुती उपाय यावर उपयुक्त ठरू शकतात. 


घोरण्याचे कारण 




घोरणे बहुतेकदा ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) नावाच्या स्लिपिंग डिसऑर्डरशी संबंधित आहे. पण, सर्व घोरण्याचे प्रकार हे ओएसए नसतात. ओएसएमध्ये सहसा मोठ्याने घोरण्याची समस्या उद्भवते. यामध्ये तुम्ही मोठमोठ्याने घोरल्याने किंवा घोरण्याच्या आवाजाने जागे होऊ शकता. यापैकी कोणतेही लक्षण जर असेल तर ते ओएसएचे लक्षण असू शकते. 



  • झोपेच्या दरम्यान श्वास थांबणे 

  • दिवसा जास्त झोप येणे 

  • उठल्यावर घसा खवखवणे

  • रात्री दम लागणे किंवा गुदमरल्यासारखे वाटणे 

  • रात्री छातीत दुखणे 

  • उच्च रक्तदाब

  • जोरात घोरणे 


वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


जीवनशैलीत बदल करा 


तुमच्या घोरण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. 



  • वजन कमी करणे

  • झोपण्यापूर्वी मद्यपान न करणे 

  • अनुनासिक रक्तसंचय उपचार 

  • पाठीवर झोपू नका 


तुमच्या पाठीवर झोपल्याने काही वेळा तुमची जीभ तुमच्या घशाच्या मागच्या बाजूला जाते. ज्यामुळे तुमच्या घशातून हवेचा प्रवाह अंशत: अवरोधित होतो. 


पुरेशी झोप घ्या 




अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लिप मेडिसिन आणि स्लीप रिसर्च सोसायटीच्या मते तुम्ही दररोज 7-8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला रात्री घोरण्याची समस्या उद्भवू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे तुमची घोरण्याची समस्या आणखी वाढू शकते. 


झोपताना डोकं जरा उंच बाजूस ठेवा 


तुमचा पलंग जर उंच असेल तर तुमचे नाकातील वायुमार्ग उघडे ठेवून घोरण्याचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. डोकं थोडं उंच ठेवण्यासाठी तुम्ही जाड उशा वापरू शकता. 


धूम्रपान करू नका 




अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते. मात्र, या सवयीमुळे देखील तुम्हाला घोरण्याचा त्रास होऊ शकतो. 2014 च्या एका अभ्यानुसार, घोरण्याचे एक संभाव्य कारण म्हणजे धूम्रपानामुळे OSA चा धोका वाढू शकतो. त्यामुळे धूम्रपानापासून दूर राहा. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील