Health Tips : वाढत्या वयात शरीराला अनेक समस्या भेडसावतात, पण त्यापैकी एक म्हणजे झोप न लागणे. प्रत्येक समस्येवर लोक बोलतात पण या विषयावर फारशी चर्चा होत नाही. ही एक समस्या आहे जी वाढत्या वयाबरोबर सर्वात जास्त दिसून येते. वृद्धत्वाचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कमी विश्रांतीची गरज आहे. परंतु तुम्हाला किमान सात ते आठ तासांची झोपदेखील मिळायला हवी.


एका संशोधनानुसार, सरासरी 30 ते 60 वयोगटातील महिला रात्री सात तासांपेक्षा कमी झोपतात. असेही आढळून आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना झोपेची समस्या जास्त असते. बहुतेक महिलांचं झोप न येण्यामागचं कारण मानसिक आणि शारीरिक बदल हे असतं. यासोबतच जास्त ताणतणाव आणि औषधे घेणे देखील आहे. पण अशा काही सवयी आहेत ज्या सहा-आठ तास पूर्ण झोप घेऊन सुधारता येतात.


'या' काही सोप्या पद्धती फॉलो करा


उबदार अंघोळ करा - चांगली झोप येण्यासाठी उबदार आंघोळ करा. तुम्ही जेव्हा अंघोळ करून बाहेर पडता तेव्हा शरीराचे तापमान कमी होते ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवण्यास मदत होते. हे तुम्हाला आराम करण्यास आणि झोपण्यास देखील मदत करतात.


स्वत:ला शांत ठेवा - रात्री दिवे बंद करण्यापूर्वी स्वत:ला शांत करण्यासाठी वेळ काढा. झोपण्याच्या एक तास आधी तुमची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि टीव्ही बंद करा, त्यानंतर स्वत:ला आराम मिळण्यासाठी तुम्ही चांगली पुस्तके वाचू शकता, संगीत ऐकू शकता.


योग करा - वाढत्या वयातील महिलांसाठी योगा करणे खूप फायदेशीर आहे. योगासने केल्याने थकवा आणि हृदय गती यांसारख्या शारीरिक घटकांमध्ये सुधारणा होते. योगाद्वारे तणाव आणि चिंतांवरही नियंत्रण ठेवता येते. मात्र, अवघड योगासने सुरुवात केलीच पाहिजे असे नाही, हलका आणि साधा योग करून चांगली झोप येऊ शकते.


चहा, कॉफी कमी प्या - वयाबरोबर चहा, कॉपीची संवेदनशीलताही वाढते. चहाचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोपही येऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी अजिबात घेऊ नका, ती प्यायल्याने झोप निघून जाईल.


थेरपिस्टचा सल्ला घ्या - जर तुम्ही जास्त तणावात असाल तर, थेरपिस्टचा सल्ला घ्या आणि तुमच्या परिस्थितीबद्दल त्यांच्याशी मोकळेपणाने बोला.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha