Health Tips : प्रदूषण, अनहेल्दी आहार, बिघडलेली जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचा ग्लो कमी होऊ लागतो. या सगळ्याशिवाय हिवाळ्याची कोरडी हवा आपली त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव बनवते. त्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो येऊ शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या खाद्यपदार्थांमुळे तुमची त्वचा ग्लोईंग होऊ शकते.


बीट 


ही लाल रंगाची भाजी तुमचे गाल नैसर्गिकरित्या गुलाबी बनवू शकते आणि तुमची त्वचा सुधारू शकते. बीटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. हे रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मुरुमांची समस्या कमी होते.


बदाम 


बदामामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई बदामामध्ये आढळते, जे सुरकुत्या आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड देखील आढळतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात आणि त्वचेची आर्द्रता लॉक करण्यात मदत करतात.


बेरी 


बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे त्वचेला तेजस्वी बनवण्यासाठी फायदेशीर असतात. ते कोलेजन तयार करण्यास देखील मदत करतात, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाच्या समस्या कमी होतात. अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल डॅमेज आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.


गाजर 


गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी आवश्यक आहे. हे कोलेजन तयार करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे वृद्धत्वाची समस्या कमी होते आणि त्वचा चमकते. गाजर त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते आणि मुरुमांपासून बचाव करते.


लिंबूवर्गीय फळे 


संत्री, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. Vitamin-C त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण करते. याव्यतिरिक्त, अँटी-ऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे, ते आपली त्वचा उजळ करण्यास, नवीन पेशी निर्माण करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : लहान वयातच मुलाचे केस पांढरे होतायत? ही समस्या दूर करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा