Health Tips : सर्वांनाच सुंदर आणि तरुण दिसायला आवडतं. अगदी वयस्कर लोकांचीसुद्धा इच्छा असते की, त्यांनी सुंदर आणि तरुण दिसावे. यासाठी लोक अनेक महागडे प्रोडक्ट्स वापरतात. तसेच डायट, जिमला जाणे यांसारख्या अनेक गोष्टी करतात. पण तुम्हला माहित आहे का अकाली वृद्धत्व येण्यामागचं नेमका कारण काय आहे? या मागे तुमची बिघडलेली जीवनशैली आणि चुकीचा आहार घेणं ही करणे आहेत. जाणून घेऊयात अशाच कोण कोणत्या चुकीच्या सवयी आहते ज्यामुळे तुम्ही लवकर वृद्ध दिसू लागतात. 


आहाराकडे लक्ष न देणे 


आजकाल जंक फूड ही जवळपास सर्वांचीच आवड बनत चालली आहे. जंक फूडमध्ये अधिक प्रमाणात साखर, मीठ यांसारखे फॅट असते. ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेजनला नुकसान पोहोचू शकते. आपल्या शरीरातील कोलेजन हे त्वचेवर बारीक रेषा दिसणे रोखण्याबरोबरच त्वचा तरुण ठेवण्यास मदत करत असते. चांगल्या आणि निरोगी त्वचेसाठी, आपल्या आहारात शक्य तितक्या हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य घ्यावे.


वेळेत न झोपणे 


चांगल्या आरोग्यासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. बहुतेक लोकांना या गोष्टीचे जाणीव नसते. या सोबतच वेळेवर झोपणे देखील तितकेच महत्वाचे आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहून योग्य झोप न घेणे हे देखील वृद्धत्वाची कारण ठरू शकते. अपुऱ्या झोपेमुळे देखील चेहेऱ्यावर वृद्धत्व दिसणे आणि प्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते. 


तणावात राहणे 


प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण हा असतो. तणावामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल हार्मोन बाहेर पडतात. हे हार्मोन्स त्वचेला तरुण ठेवणारे कोलेजन आणि केरोटिन कमी करतात. त्यामुळे जर तुम्हाला तणावमुक्त राहायचं असेल तर रोज मेडिटेशन करायला हवे. बर्‍याच संशोधकांनी असा दावा केला आहे की, नियमित मेडिटेशन केल्याने तणावापासून मुक्त होण्यास आणि आनंदी राहण्यास मदत होते. 


अनहेल्दी लाइफस्टाइल 


कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली न करणे, मद्यपान आणि धूम्रपान यांचे सेवन न करणे. या वाईट सवयींमुळे देखील तुमच्या चेहेऱ्यावर वृद्धत्व दिसू शकते. यापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. तसेच मद्यपान आणि धूम्रपान यांचे सेवन करणे टाळावे.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : कोणत्या फळांच्या साली काढाव्यात आणि कोणती सालीसकट खावीत? तुम्हीही गोंधळता का? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात