Health Tips : आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी डोळे हे अतिशय महत्त्वाचे आणि नाजूक असतात. डोळ्यांबाबत (Eyes) कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आपल्याला महागात पडू शकतो. आपल्या आहाराच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे (Lifestyle) डोळ्यांच्या समस्या झपाट्याने वाढतायत. डोळ्यांबाबत गंभीर राहण्याचा सल्लाही डॉक्टर अनेकदा देतात. डोळ्यांच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये, असे डॉक्टरांकडून वारंवार सांगण्यात येते. कारण डोळे इतके संवेदनशील असतात की त्यांच्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्व येऊ शकते. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


'या' समस्या उद्भवण्याची शक्यता 
 
डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका


तज्ज्ञांच्या मते डोळ्यांचा (Eyes) त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यामुळे लहानपणापासूनच डोळ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांमध्ये ग्लूकोमाची समस्या झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे कालांतराने अंधत्वाचा धोका वाढू शकतो. इतकेच नाही तर वाढत्या वयाबरोबर होणारी मोतीबिंदूची समस्याही डोळ्यांची दृष्टी हिरावून घेते. त्यामुळे डोळ्यांशी संबंधित काही लक्षणे दिसल्यास सावध राहणं गरजेचं आहे.
 
धूसर दृष्टी


जर डोळे अंधुक दिसले तर ते अनेक प्रकारच्या समस्या आणि रोगांचे लक्षण असू शकते. काही प्रकरणांमध्ये, हे मोतीबिंदू किंवा लेन्स संबंधित समस्येमुळे देखील असू शकते. त्यामुळे तातडीने उपचार करावेत. तज्ज्ञांच्या मते, बहुतेक मोतीबिंदू हे वयाबरोबर डोळ्यांमध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे होतात, त्यामुळे वेळीच काळजी न घेतल्यास त्यांना अंधत्व येऊ शकते.
 
डोळ्यांच्या मज्जातंतूंमध्ये समस्या


डोळ्यांच्या मज्जातंतूंच्या समस्यांमुळेही अंधत्व येऊ शकते. यामुळे पाहण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ग्लूकोमा हा असाच एक आजार आहे. हे डोळ्यांतील अनेक प्रकारचे आजार दर्शवते. ग्लूकोमासाठी कोणतीही निश्चित उपचार पद्धती नाही. मात्र, वेळेवर उपचार केल्याने ही समस्या दूर केली जाऊ शकते.
 
डोळा दुखण्याची समस्या


डोळ्यांच्या (Eyes) अनेक आजारांमुळे वेदना वाढू शकतात. डोळ्यांना दुखापत झाल्यामुळे वेदना होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, डोळे दुखणे म्हणजे डोळ्यांवर खूप दबाव निर्माण होतोय. हे देखील ग्लूकोमाचे लक्षण असू शकते. हा त्रास बराच काळ राहिल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. अन्यथा, यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?