Health Tips : कोरोनानंतर (Corona) लोकांना अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे काही लोकांच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होत आहे. काही लोक चिंता आणि झोप न लागण्याच्या समस्येने देखील त्रस्त आहेत. कोरोना संसर्गामुळे सध्या घरूनच काम सुरु असल्याने देखील अनेक मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत.


या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी, आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा मेंदू सक्रिय बनवू शकता. चला तर, जाणून घेऊया...


भोपळ्याच्या बिया


मेंदूला निरोगी आणि सक्रिय बनवण्यासाठी भोपळ्याच्या बियाही फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय यात अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, कॉपर आणि आयर्नही मुबलक प्रमाणात असतात. भोपळ्याच्या बिया मेंदूला ऊर्जा देतात. यामुळे विचार करण्याची क्षमता सुधारते, तसेच मेंदूचा विकासही चांगला होतो.


अक्रोड


मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज अक्रोड खावेत. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण बनवतो आणि निरोगी ठेवतो. अक्रोडमध्ये असे पोषक घटक असतात, ज्यामुळे मेंदू सक्रिय होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर, मॅंगनीज आणि अँटिऑक्सिडंट असतात.


अंडी


अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. अंडी हे शरीर आणि मन दोन्हीसाठी उत्तम अन्न आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीनसारखे पोषक घटक असतात, जे मेंदूला निरोगी ठेवतात. व्हिटॅमिन बी उदासीनता आणि नैराश्य दूर करण्यास मदत करते. तर, त्यातील कोलीनमुळे मेंदूची शक्ती वाढते.


डार्क चॉकलेट


डार्क चॉकलेटचे सेवन मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्यासाठी जेवढे स्वादिष्ट आहे, तेवढेच त्याचे अनेक फायदेही आहेत. कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. याच्या सेवनाने चिंता, तणाव आणि नैराश्य दूर होते.


हिरव्या भाज्या


मेंदूसह शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करावा. हिरव्या भाज्या खाल्ल्याने मेंदूला पोषण मिळते. यासाठी आहारात पालक, ब्रोकोली आणि केल यांसारख्या भाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन यांसारखे पोषक घटक असतात, जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha