Health Tips : गर्भधारणा (Pregnancy) हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या दरम्यान स्त्रीला तिच्या आहार आणि लाईफस्टाईलची खूप काळजी घ्यावी लागते. गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. या दरम्यान अशी काही फळे आहेत ज्यांचे सेवन गर्भधारणेदरम्यान महिलांना हानिकारक ठरू शकते. या फळांमध्ये आढळणारी काही रसायने आणि संयुगे गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे गर्भपात किंवा प्रसूतीचा धोका वाढतो. गरोदरपणात या फळांचे सेवन न करणे हा उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया गरोदरपणात कोणत्या फळांपासून दूर राहणं गरजेचं आहे.


गरोदरपणात पपई खाऊ नका 


गरोदरपणात पपई खाणे टाळावे कारण त्यात आढळणारे पपेन आणि पेप्टीन हे एन्झाइम गर्भधारणेसाठी हानिकारक ठरू शकतात. पपईमध्ये कार्पेन नावाचे एन्झाइम आढळते ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. याशिवाय पपईमध्ये लेटेक्स नावाचे प्रोटीन असते ज्यामुळे गर्भाशयात सूज येऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात पपईचे सेवन करू नये. त्यामुळे गरोदर महिलांनी कच्ची पपई पूर्णपणे टाळावी. पिकलेल्या पपईचे सेवन सुरक्षित मानले जाते कारण पपईमध्ये असलेले पॅपेन एंझाइम शिजवल्याने नष्ट होते. तरीही, पिकलेली पपई देखील मर्यादित प्रमाणात खावी. गर्भधारणेदरम्यान, सर्व फळे आणि भाज्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खाव्यात.


अननस देखील गरोदरपणात खाऊ नये


गर्भधारणेदरम्यान अननसाचे सेवन करू नये कारण त्यात ब्रोमेलेन नावाचे रसायन आढळते जे गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकते. अननसात असलेले ब्रोमेलेन हे एक प्रकारचे फायटोकेमिकल आहे जे गर्भाशयाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते. क्रॅम्पस कारणीभूत ठरते. हे स्नायूंच्या आकुंचनला प्रवृत्त करते ज्यामुळे गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांनी अननसाचे सेवन पूर्णपणे बंद करावे. गर्भधारणेदरम्यान अननस खाल्ल्याने गंभीर गुंतागुंत होऊ शकते. 


केळ्याचं सेवन करू नये


गरोदरपणात टाळावीत अश्या फळांच्या यादीत ह्या फळाचे नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. गरोदरपणात केळी खाणे सुरक्षित मानले जात असले तरी काही विशिष्ट प्रकरणांमध्ये ते टाळले पाहिजे. विशेषत: ज्या महिलांना एलर्जी आहे अशा महिलांनी केळ्याचं सेवन करू नये. केळीमध्ये चिटिनेज, लेटेक्स सारखा पदार्थ असतो ज्यामुळे ऍलर्जी होते. ह्या पदार्थामुळे शरीरातील उष्णताही वाढते. त्यामुळे ज्या महिलांना ऍलर्जी आहे त्यांनी केळीचे सेवन करू नये. केळ्यामध्ये साखरेचे प्रमाणही चांगले असते, त्यामुळे मधुमेहींनी केळी खाणे कधीही टाळावे.


खजूर खाऊ नयेत


खजुरामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि आवश्यक पोषक घटक असतात. पण, गर्भवती महिलांना खजूर न खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर शरीरातील उष्णता वाढवते आणि त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन देखील होऊ शकते. म्हणून दररोज एक किंवा दोन खजूर खाणे चांगले आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात खजुराचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा