Health Tips : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे आहार (Food) घेतात. पण कधी कधी आहार बदलल्याने फारसा फायदा होत नाही. फक्त डाएटच नाही तर लोक जिममध्ये जाण्याबरोबर सप्लिमेंट्सही घेतात. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही थकवा येत असेल, तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
जर तुम्हालाही काय खावे, कसे खावे आणि काय खाऊ नये हे समजत नसेल तर याबाबत आता अधिक संभ्रम करण्याची गरज नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असे काही कच्चे पदार्थ आहेत ज्यांचे शिजवलेल्या पदार्थांपेक्षा जास्त फायदे आहेत. यामध्ये अनेक पोषक तत्वांचा समावेश होतो. कच्चा पदार्थ शरीरासाठी फायदेशीर तर असतातच पण ते रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवण्यास मदत करतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही हेल्दी डाएट बद्दल सांगणार आहोत.
कच्चे गाजर (Raw Carrot)
कच्च्या गाजरांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन ए, के, सी, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. तुम्हाला माहित आहे का की, गाजर शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाण्याचे जास्त फायदे आहेत. कच्च्या गाजरात असलेले अँटीऑक्सिडंट डोळे, त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्यांवर कच्चे गाजर फार फायदेशीर ठरतात.
बीट
ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशा लोकांनी आपल्या आहारात बीटचा समावेश करा. हे खाल्ल्याने हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. सॅलडमध्ये बीट तुम्ही कच्चेही खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा ज्यूस देखील पिऊ शकता. बीट हृदयरोग, कर्करोग आणि यकृत यांसह अनेक रोगांपासून संरक्षण करते.
टोमॅटो (Tomato)
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी, फायबर आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. भाजीची चव बदलणारा टोमॅटो सॅलडमध्येही कच्चा खाल्ला जातो. अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले टोमॅटो मधुमेह आणि कर्करोगासारख्या अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे आतापासून तुम्हीही निरोगी राहण्यासाठी या कच्च्या भाज्या खाण्यास सुरुवात करा. हृदयरोग, कर्करोग आणि यकृत यांसह अनेक रोगांपासून संरक्षण करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :