Health Tips : मासिक पाळी (Periods) दरम्यान तीव्र पोटदुखीचा त्रास अनेक महिलांना (Women) होतो. पोटाच्या खालच्या भागात हा त्रास होतो. काही महिलांना तर पाळी येण्याच्या दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या पोटात दुखू लागते. अशा परिस्थितीत बहुतांश महिला वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घेतात. खरंतर, पेनकिलर हे आरोग्यासाठी फार घातक ठरू शकते. अशा वेळी काही घरगुती उपाय आहेत जे पीरियड्सच्या काळात आपण सकाळी घेतले तर तुम्हाला दिवसभर आराम मिळेल आणि ऑफिसलाही जाता येईल.
कोमट पाण्यात तूप घाला
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्यायल्याने महिलांना मासिक पाळीच्या काळात खूप आराम मिळतो. मासिक पाळी दरम्यान पोटाशी संबंधित समस्या आणि वेदना टाळायच्या असतील तर मासिक पाळी येण्याच्या दोन दिवस आधी महिलांनी ते नियमितपणे पिणे सुरू केले पाहिजे. आंतरिक सूज कमी करण्यात आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी हा फायदेशीर उपाय आहे. महिला या घरगुती उपायाचा वापर करू शकतात.
आल्याचा चहा
आल्याचा चहा मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे पोटाच्या आवरणाची जळजळ कमी करण्यास मदत करतात. याशिवाय पोटातील गॅस, अॅसिडीटी आणि इतर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही आल्याचा चहा फार गुणकारी आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आल्याचा डेकोक्शन प्यायल्याने पोटाच्या खालच्या दुखण्यापासून आराम मिळतो. हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.
मनुक्याचं पाणी आणि केशर
मनुका आणि केशरचे पाणी पोटदुखी, मूड स्विंग्स आणि मासिक पाळीच्या दरम्यान होणार्या इतर समस्यांपासून मुक्त होण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही 4 मनुके आणि दोन केशर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळे दिवसभर पोटदुखी थांबते. कारण मनुक्यात असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवून पोटाशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते. केशरमध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म पोट आणि आतड्यांमधील सूज कमी करून आराम देतात. त्यामुळे तुम्ही पोटदुखी कमी करण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा नक्की वापर करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.