Ginger benefits : आल्याचा (Ginger) वापर खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टींमध्ये केला जातो. पुष्कळ लोक सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा मजबूत चहा पितात, तर काहीजण आलं पाण्याबरोबरही खातात. आल्याचे पाणी पिण्याचेही अनेक फायदे आहेत. विशेषत: अशा लोकांसाठी जे त्यांच्या लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत आणि त्यांना लवकरात लवकर वजन कमी करायचे आहे. परंतु, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्या. जेणेकरून त्याचा फायदा होईल. आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि अनेक खनिजे आढळतात. ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होते आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, तर मग जाणून घेऊयात आल्याच्या फायद्यांविषयी...


रोगप्रतिकारशक्ती वाढवा - जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर आल्याचे पाणी त्यासाठी रामबाण उपाय आहे. आलं तुमच्या शरीरातील अनेक रोग आणि अनेक प्रकारच्या वाईट बॅक्टेरियापासून तुमचे रक्षण करते आणि त्याच वेळी तुम्हाला निरोगी ठेवते. याबरोबरच आल्याचे पाणी तुम्हाला फ्ल्यूपासून वाचवते आणि इन्फेक्शन होण्याची शक्यताही कमी करते.


बद्धकोष्ठतेवर उपाय - आल्यामध्ये मॅंगनीज, सॉर्बिटॉल, आयसोटोन, फोलेट इत्यादी असतात. ज्यामुळे तुमच्या बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी दिवसातून एकदा तरी अद्रकाचे सेवन करणे आवश्यक आहे.


हृदयासाठी चांगले - आले हे हृदयासाठीही खूप चांगले मानले जाते कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म देखील आहेत. परंतु, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


हाडांसाठी फायदेशीर - आल्याचे पाणी हाडांचे आरोग्य सुधारण्यासही मदत करते. यामध्ये फोलेट आणि पोटॅशियम सारखे घटक असतात. जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha