Health Tips : आपले शरीर ज्या पेशींपासून बनलेले आहे त्या पेशींमध्ये 75 टक्के पाणी (Water) असते. पाण्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. डॉक्टरांपासून ते आरोग्य तज्ज्ञांपर्यंत सांगतात की, जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असेल किंवा दिवसभर उत्साही राहायचं असेल, तर दररोज किमान 2-3 लिटर प्या. पाण्याच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन आणि पोषण पेशींपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. पाणी जरी आपल्यासाठी अमृत असले तरी चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायले तर यामुळे अनेक नुकसान होऊ शकते.
पाणी पिताना 'या' चुका करू नका
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पिण्याचे पाणी
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिऊ नये. एका अभ्यासानुसार प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये प्लास्टिकचा कचरा वाढतो. मायक्रोप्लास्टिक प्रदूषण 80 टक्के लोकांच्या रक्तात आढळते. त्यामुळे आरोग्याचं नुकसान होऊन कर्करोग देखील होऊ शकतो.
तुम्ही दिवसातून किती पाणी पिणं गरजेचं?
पुरेसे पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. आजकाल कामामुळे लोक पाणी प्यायला विसरतात. तज्ज्ञांचे मत आहे की, हायड्रेटेड राहण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे.
एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका, यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो.
अनेकजण एकाच वेळी खूप पाणी पिण्याची चूक करतात. मात्र, एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने सूज, अस्वस्थता देखील येऊ शकते, जे तुमच्यासाठी धोकादायक आहे.
जेवताना पाणी पिऊ नये
जेवताना पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जेवताना पाणी प्यायल्याने शरीराला अन्न पचण्यास त्रास होतो. जेवणापूर्वी किंवा नंतर किमान 30 मिनिटे पाणी प्यावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या होत नाही.
फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका
खूप थंड पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या शरीराची अन्न पचवण्याची क्षमता कमी होऊ शकते. तज्ञांच्या मते, रूम टेंम्प्रेचरनुसार किंचित उबदार पाणी प्यावे.
जास्त खनिजे असलेले पाणी पिऊ नका
जास्त खनिजे असलेले पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हे पाणी जास्त प्यायल्याने तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
उभे राहून पाणी पिऊ नका
उभे राहून पाणी प्यायल्याने पोटावर परिणाम होतो. त्यामुळे पाणी पिताना बसून ते आरामात प्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :