Health Tips : बद्धकोष्ठतेमुळे (Constipation) अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. बद्धकोष्ठाचा त्रास फक्त उन्हाळ्यातच (Summer) नाही तर हिवाळ्यातही (Winter) होतो. याचे कारण अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी असू शकतात. बद्धकोष्ठतेमुळे पोटदुखी आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास समस्या वाढू शकते. हिवाळ्यात बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय.


फायबरयुक्त पदार्थ खा


बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी फायबर सर्वात महत्वाचे आहे. कारण हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक लोक प्रक्रिया केलेल्या आणि कमी फायबरच्या वस्तू खातात. अशा स्थितीत बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. त्यामुळे फायबर युक्त गोष्टींचा आहारात समावेश करा आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहा.


दुग्ध उत्पादने 


हिवाळ्याच्या काळात दूध, दही किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचा वापरही वाढतो. अशा परिस्थितीत लैक्टोजचा सामना करणाऱ्या लोकांना बद्धकोष्ठता किंवा पचनाशी संबंधित समस्या असू शकतात. अशा स्थितीत या ऋतूत फक्त गरम दुधाचे सेवन करा आणि जर तुम्ही लैक्टोज असहिष्णु असाल तर दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहा. अन्यथा बद्धकोष्ठतासारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.


पिण्याचे पाणी कमी करू नका


थंडीच्या दिवसांत बरेच लोक पाणी प्यायल्या विसरतात. यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात भरपूर पाणी प्यावे. प्रत्येक तासाला पाणी शरीरात पोहोचेल याची खात्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठता आणि पचन यांसारख्या समस्या टाळता येतात.


अल्कोहोल आणि कॅफिन टाळा


हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी बहुतेक लोक दारू, चहा आणि कॉफीचे अनेक वेळा सेवन करतात. या ऋतूमध्ये अति प्रमाणात अल्कोहोल आणि कॅफिनमुळेही डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे अल्कोहोल आणि कॅफिनचे पेय पिणे टाळा. जर, तुम्ही हे पदार्थ ट्राय केले तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून नक्कीच आराम मिळू शकतो. बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि गॅस यांसारख्या समस्येपासून जर तुम्हाला आराम हवा असेल तर या पदार्थांचं तुम्ही सेवन करणं फार गरजेचं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय