Health Tips : बदलत्या जीवनशैलीनुसार (Lifestyle) गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याचे (Heart Attack) प्रमाण अधिक वाढत चाललं आहे. याशिवाय तरुण-तरुणीही हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. आजकाल ताणतणाव, योग्य आहार न घेणे, व्यायामाचा अभाव यामुळे लोकांची जीवनशैली बदलत असल्याने तरूणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी खातो ज्या आपण खाणं खरंतर चुकीचं आहे. हे खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. कोणकोणत्या गोष्टींमुळे व्यक्ती हृदयविकाराचा शिकार होऊ शकते याच्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


पिठाचा जास्त वापर करू नका


जास्त प्रमाणात पीठ खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पिठाचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. पीठ हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा फॅट आहे, जो शरीराच्या अवयवांना रक्तपुरवठा करण्याच्या मार्गात जमा होतो. जास्त पीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी तुम्ही पिठाचं सेवन कमी प्रमाणात करणं गरजेचं आहे. 


साखर टाळा 


साखर खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिन वाढते. त्यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही आणि मधुमेहाचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. मधुमेही लोकांनी तर साखरेचं सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यासाठी साखरेचं सेवन करू नका. 


सोड्याचं सेवन करू नका 


खाण्यातील सोड्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो. ज्यामुळे मधुमेह देखील होऊ शकतो. याशिवाय हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. यासाठी तुमच्या आहारात सोडा जितका कमी प्रमाणात वापरता येईल तितका तो वापरावा.


मीठ खाण्याचा धोका


मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मीठ कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम करते. मिठाशिवाय जेवणच अपूर्ण वाटतं. पण, जास्त मीठ खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्यानेही शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदय अपयश आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी मिठाचं सेवन करू नये. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय