Health Tips Benefits Of Eating Desi Ghee : तूप आपण पोळीला लावून खातो किंवा भाजीमध्ये मिक्स करून खातो. पण तूप खाणं हे आरोग्यासाठी फायदेशिर आहे हे अनेकांना माहित आहे. पण सकाळी अनोशी पोटी (With Empty Stomach) तूप खाल्ल्यानं शरीरात ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अॅसिड, विटॅमिन ए, विटॅमिन यांचे प्रमाण वाढते. तसेच तूप खाल्ल्यानं अनेक आजार दूर होतात. जाणून घेऊयात सकाळी  उठल्यानंतर अनोशीपोटी तूप खाण्याचे  फायदे-


हाडे मजबूत होतात-
सांधे दुखी हाडांची झिज इत्यादी समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अनोशीपोटी एक चमचा तूप खावे. 


त्वचे संबंधित समस्या
त्वचेची खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे किंवा त्वचेवर पुरळ येणे इत्यादी समस्या जाणवत असतील तर सकाळी तुप खा. दूधात तूप मिक्स करून ते दूध तुम्ही पिऊ शकता.


केस दाट होतात
तुपामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन असतात.  अनोशीपोटी तूप खाल्ल्यानं केस घनदाट होतात. तसेच केस गळती देखील कमी होते. 


शरीराच्या अंतर्गत पेशींचे पोषण होते
आयुर्वेदानुसार गाईच्या दुधात तूप मिसळून प्यायल्याने तुमच्या शरीराला सुपर फूडसारखे पोषण मिळते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha