Aaditya Thackeray : गेल्या 2 वर्षापासून जगावर, देशावर आपल्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे. त्या संकटातून लवकर बाहेर पडून आमच्या हातून चांगलं काम व्हावं. ते काम करण्याची शक्ती मिळू दे, एवढचं मागणं अंबाबाई चरणी मागितल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितले. ज्यावेळी आम्ही प्रत्येक मंदिरात जातो तेव्हा आमच्या हातून चांगले काम व्हावं, महाराष्ट्रासाठी, देशासाठी, समाजाची आमच्या हातून सेवा घडावी हेच साकडं आम्ही घालत असतो असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी अंबाबाईची विधीवत पुजा देखील केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमच्या हातून सामाजासाठी चांगले काम घडावे असे मागणं अंबाबाई चरणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. काल संध्याकाळपासून आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले आहेत. त्याठिकाणी ते अदिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाच्या बाबतीत चर्चा करणार आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गला जाणार आहेत. त्याठिकाणी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळते आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. या नोटिशीवरुन राणे कुटुंबीय आक्रमक झाले असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. आधी म्याव म्याव प्रकरण आणि त्यानंतर संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना झालेल्या अटकेनंतर आदित्य यांचा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- '...अन्यथा लक्षात ठेवा 3 कोटी धगनर बांधवांशी गाठ!' गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात; तर महापालिकेचे पथक राणेंच्या जुहूमधील बंगल्यावर