Beetroot Juice Benefits : बीट हा असा एक पदार्थ आहे ज्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने खा त्याचा तुम्हाला फायदाच मिळतो. काही लोक बीटचा सॅलडमध्ये वापर करतात, तर काही त्याची भाजी करतात. बीटचा पराठासुद्धा खूप पौष्टिक मानला जातो. काही लोक बीटचे लोणचेदेखील बनवतात. जर तुम्हाला बीटचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचा ज्यूस देखील पिऊ शकता. बीटचे आरोग्यदायी कोणते फायदे आहेत हे जाणून घ्या. 


बीट तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनविण्यास मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते, त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. जाणून घ्या बीटचा ज्यूस पिण्याचे फायदे.


1. रक्तदाब नियंत्रणात ठेवा : अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो. या रसामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात. नायट्रिक ऑक्साईड रक्त पेशींना आराम देते आणि रक्त प्रवाह सुधारते.


2. स्टॅमिना वाढवा : व्यायाम करण्यापूर्वी बीटचा रस प्यायल्यास स्टॅमिना वाढतो. एक ग्लास बीटरूट ज्यूस प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते. याच्या मदतीने तुम्ही वेगवान व्यायाम सहज आणि जलद करू शकता. असे व्यायाम केल्याने शरीरात सहनशीलता निर्माण होते.


3. प्रदूषणापासून वाचवा : बीटरूट ज्यूस प्यायल्याने शरीराला बेटेन मिळते. हे एक पोषक तत्व आहे जे पेशी, एंजाइम आणि ऊतकांना प्रदूषणापासून संरक्षण करण्यास मदत करते. यामुळे चिडचिड कमी होते आणि शरीर आतून निरोगी राहण्यास मदत होते. बीटचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला आहे.


4. कॅन्सरपासून बचाव : बीटरूट ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. यामध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट्स कॅन्सरविरूद्ध प्रभावी आहेत. बीटरूटचा अर्क पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीर निरोगी राहते.


5. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते : जे लोक रोज बीटचा रस पितात त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


6. वजन कमी करण्यात मदत : बीटमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते. बीटरूटमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे मज्जासंस्था आणि स्नायू निरोगी होतात. यामध्ये आढळणारे मॅंगनीज हाडे, यकृत आणि किडनीसाठी चांगले असते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :