Health Tips : तापमान जसजसे कमी होत आहे तसतशी थंडीची चाहूल लागली आहे. ऑक्‍टोबर संपताच हवामानात बदल होऊ लागले असून आता सर्वजण थंडीच्या तयारीत व्यस्त आहेत. या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: जर तुम्हाला मधुमेह असेल तर या ऋतूत तुम्हाला स्वतःची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल.


अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण हिवाळ्यात आहारात काही योग्य बदल करून स्वतःची काळजी घेऊ शकतात. हिवाळ्यात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही हिवाळ्यातील सुपरफूडचा समावेश करू शकता. जर तुम्हालाही मधुमेहाचा त्रास असेल तर हिवाळ्यात या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.


गाजर


हिवाळा येताच बाजारात गाजर उपलब्ध होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर हिवाळ्यात गाजराचा तुमच्या आहारात समावेश करा. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे रक्तप्रवाहात साखरेचे उत्सर्जन कमी करते आणि तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलेले वाटते. तुम्ही गाजरचं सॅलड करू शकता. तसेच, कच्चे गाजर, सूप मध्ये देखील तुम्ही गाजर खाऊ शकता.  


दालचिनी


दालचिनीचा वापर अनेकदा जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, जेवणाची चव वाढवण्याबरोबरच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही हे खूप उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध, दालचिनी शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. दालचिनी ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड्स दोन्ही पातळी सामान्य करते. मधुमेह आणि अनेक हृदयरोगांचा धोका कमी करते.


आवळा


आवळा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. हे क्रोमियममध्ये समृद्ध आहे, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर करते आणि इंसुलिन संवेदनशीलता सुधारते. याव्यतिरिक्त, ते व्हिटॅमिन सीमध्ये समृद्ध आहे, ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना फायदा होतो. आवळा तुम्ही मुरांबा, लोणचे, चटणी किंवा ज्यूसच्या स्वरूपात घेऊ शकता.


बीट


टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी बीट खूप फायदेशीर आहे. पोटॅशियम, लोह, मॅंगनीज आणि फायटोकेमिकल्स यांसारख्या फायबर आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध, बीट रक्तातील साखर कमी करण्यास आणि शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. 


संत्री


डायबिटीजच्या रुग्णांसाठी संत्र हे सुपरफूड मानले जाते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे, हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही सॅलड आणि ज्यूसच्या स्वरूपात ते तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी