Health News : आजकाल लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी प्रत्येकजण डाएटिंग आणि व्यायामाचा पर्याय निवडतात. पण, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा केस गळतात हे तुम्हाला माहित आहे का? खरंतर, बरेच लोक वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करतात. ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते. त्यामुळे केस गळायला लागतात. हे नेमकं का होते? आणि ते टाळण्यासाठी काय केले पाहिजे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


डायटिंगमुळे केस गळतात का?


बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी आहार घेतात. वजन कमी झाले की शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात. केस मुळापासून कमकुवत झाल्यामुळे असे होते. पुरेशा प्रमाणात प्रथिने, लोह आणि इतर आहारातील फायबर सप्लिमेंट्सच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. अशा परिस्थितीत पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसांना पोषण मिळत नाही आणि केस गळू लागतात.


केसांना इजा न करता वजन कसे कमी कराल?


1. प्रथिनांचे पुरेसे सेवन


लाल मांस, मासे आणि बीन्समध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. प्रथिने केसांच्या कूप आणि निरोगी आहारास मदत करतात. प्रथिने अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. अंडी, पालक, लिंबूवर्गीय फळे, नट, गाजर, एवोकॅडो आणि संपूर्ण धान्य हे निरोगी आहार आहेत, ज्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकते आणि केसांना इजा होणार नाही.


2. मर्यादित कॅलरी वापरा


पुरेशा प्रमाणात कॅलरीज घेतल्याने शरीराला कार्य करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, कॅलरी मर्यादित असणे आवश्यक आहे. तसेच, खूप जास्त कॅलरी कमी केल्याने पौष्टिकतेची कमतरता होते आणि केसांना नुकसान होऊ शकते.


3. व्हिटॅमिन समृद्ध आहार


केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, आयर्न आणि झिंक हे खूप महत्वाचे आहेत. हे जीवनसत्त्व वजन कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानले जाते. त्यामुळे व्हिटॅमिन समृद्ध असलेले डाएट फॉलो करावे. तुम्हाला जर केसगळतीपासून सुटका हवी असेल तर हे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय