Health News : भारतीय जेवणात हा पदार्थ अमृतासमान मानला जातो. आयुर्वेदातही (Ayurveda) या पदार्थाचे खूप महत्त्व आहे. खरं म्हणजे भारतात हिंगाचा (Hing) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कडधान्य, भाज्या, सूप यांसारख्या पदार्थांमध्ये चव आणि सुगंधासाठी याचा वापर केला जातो, परंतु तुम्हाला माहिती आहे का? की हिंग औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तसेच हिंगाचे पाणी रोज प्यायल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
पचनासाठी उत्तम
भारतातील प्रत्येक घरात सामान्यतः हिंगाचा वापर केला जातो. हिंग हे जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकले जाते. फेरुला वनस्पतीच्या मुळापासून हिंग मिळते. हे पावडरच्या स्वरूपात उपलब्ध आहे. याची तिखट चव, याला गंध असतो. शिजवल्यावर हिंग अन्नाला एक वेगळी चव आणते. आयुर्वेदानुसार, हिंग पचनास मदत करते, गॅस वायू काढून टाकते आणि अनेक रोगांवर मदत करते. हिंग फार कमी प्रमाणात वापरतात. चिमूटभर हिंग टाकल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत होते. हे सामान्यतः भाज्या आणि डाळीमध्ये याचा वापर केला जातो, ते शरीराला पचण्यास सोपे करते. काही पदार्थ खाल्ल्यानंतर अपचन किंवा गॅसचा त्रास होत असेल, तर त्यात हिंग टाका.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
एक चिमूटभर हिंग वजन कमी करण्यात देखील मदत करू शकते. कारण हिंग शरीरातील पचन आणि चयापचय गतिमान करते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासही ते उपयुक्त ठरते. दररोज रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत होऊ शकते.
त्वचेसाठी वरदान
हिंग हा अँटिऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला जळजळ होण्यासारख्या अनेक समस्यांपासून दूर ठेवतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारखी अनेक संयुगे असतात. जी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
खोकल्यासाठी उपयुक्त
अभ्यासानुसार, खोकला बरा करण्यासाठी हिंग प्रभावीपणे मदत करू शकते. खोकला आणि श्वसनाच्या इतर समस्यांवरही हे घरगुती औषध आहे. दमा, कोरडा खोकला आणि कफ असलेल्या व्यक्तींसाठी हिंगातील दाहक-विरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म देखील उपयुक्त ठरू शकतात.
सूजेपासून आराम
सूज आल्यास हिंग अतिशय उत्तम आहे. पोटात गॅसमुळे होणाऱ्या वेदनांपासूनही हिंग आराम देऊ शकतो. हिंगाच्या अँटिस्पास्मोडिक आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे ते जळजळ करण्यासाठी एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे.
रक्तदाब
उच्च रक्तदाबावरही हिंग खूप उपयुक्त ठरू शकते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हिंगाचा वापर नियमित केला जातो.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weight Loss : झटपट वजन कमी होईल, नव्या संशोधनात खुलासा! आठवड्यातून एकदा 'हे' काम करा