Health : मागील काही वर्षात कोरोना व्हायरसने (Corona Virus) अवघ्या जगभरात थैमान घातले हाेते, यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आता मंकीपॉक्स विषाणूचाही विविध देशात उद्रेक पाहायला मिळाला, त्यानंतर आता 'अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स'(Antimicrobial Resisrtance) नावाच्या आजाराची भीती जगाला सतावू लागली आहे. एका नवीन अभ्यासात वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी विविध देश सतर्कतेच्या मार्गांवर आहे. अशा स्थितीत भारतातील जनतेला भीती वाटणे स्वाभाविक आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली या रोगावरील आपली दुसरी उच्च-स्तरीय बैठक घेण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे. 


 


हा आजार अनेक लोकांचा जीव घेऊ शकतो


एका नवीन अहवालात असे दिसून आले आहे की, आत्ता आणि 2050 दरम्यान, 39 दशलक्ष (सुमारे 4 कोटी) मृत्यू थेट अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) संसर्गामुळे होणार असल्याचा अंदाज आहे, AMR जीवाणू अप्रत्यक्षपणे 169 दशलक्ष मृत्यूंना कारणीभूत ठरणार आहेत.



भारतासह या देशांनाही बसणार फटका?


ग्लोबल रिसर्च ऑन अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स (GRAM) प्रकल्पाद्वारे जागतिक स्तरावर आयोजित केलेल्या पहिल्या सखोल विश्लेषणातून हे भाकीत झाले आहे. 'द लॅन्सेट' मध्ये प्रकाशित केलेला हा अभ्यास 1990 ते 2021 पर्यंतच्या AMR ट्रेंडची माहिती देतो. तसेच 204 देश आणि प्रदेशांसाठी 2050 पर्यंत संभाव्य परिणामांचा अंदाज लावतो. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या दक्षिण आशियाई देशांना या आजाराचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची भीती आहे.


 


एक आव्हान


ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठातील प्राध्यापक राजारामन एरी म्हणाले, "जीवाणू, बुरशी आणि विषाणू सूक्ष्मजीव जेव्हा औषधांना प्रभावीपणे प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा प्रतिजैविक प्रतिकार होतो, ज्यामुळे संक्रमण कठीण होते. रोगाचा प्रसार, गंभीर आजार, मृत्यूच्या जोखमीवर उपचार करणे तसेच प्रतिजैविक प्रतिकार वाढणे हे आधुनिक औषधांसमोर एक गंभीर आव्हान आहे. सध्याच्या ट्रेंडच्या आधारे, संशोधकांचा अंदाज आहे की AMR मुळे होणारे वार्षिक मृत्यू 2050 पर्यंत 1.91 दशलक्ष पर्यंत वाढतील आणि ज्या मृत्यूंमध्ये AMR ची भूमिका आहे ते 8.22 दशलक्ष पर्यंत वाढतील. 2021 च्या तुलनेत ही वाढ अनुक्रमे 67.5% आणि 74.5% आहे.


 


हेही वाचा>>>


Health : मधुमेह, हृदयविकार लवकरच महामारीचे रुप धारण करणार? रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, WHO चा गंभीर इशारा


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )