Coffee Or Chocolate : अनेकांना सकाळी कॉफी प्यायची सवय असते. तसेच काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स खायला आवडतात. अनेकांना असा प्रश्न पडत असेल की चॉकलेट की कॉफी या दोन्ही पैकी आरोग्यासाठी काय फायदेशिर  आहे? जाणून घेऊयात काय खाणे शरीरासाठी चांगले आहे. 


एका व्यक्तीला 4 कप कॉफी प्यायल्यानंतर जेवढ्या प्रमाणात कॅफेन मिळते. तितकेच कॅफेन 7 चॉकलेट खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला मिळते. यानुसार कॉफी ऐवजी हॉट चॉकलेट पिणे आरोग्यासाठी फायदेशिर आहे. 
कॉफी प्यायल्याने होणारे फायदे- कॉफीमध्ये कॅफेन असते. कॅफेनमुळे शरीरात एनर्जी येते. तसेच थकवा देखील कॉफी प्यायल्याने दूर होते.  कॉफी प्यायल्याने शरीरात 10 टक्के  मेटाबॉलिक रेट वाढतो.त्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. 
चॉकलेट खाण्याचे फायदे- लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट्स खायची आवड असते. डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट असे अनेक प्रकारचे चॉकलेट्स बाजारात मिळतात. डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर  यांसारखे घटक असतात. पण चॉकलेटचे काही पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने तुमचे हृदय देखील निरोगी राहते कारण डार्क चॉकलेट खाल्ल्याने  ब्लड फ्लों चांगला होतो. चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. 
 


कॉफी प्यायल्याने होणारे नुकसान-
कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं आहे.चीन, ईराण, तुर्की, दक्षिण अमेरिका या ठिकाणी हे संशोधन करण्यात आलं. या ठिकाणी कॉफी जवळपास 70 डिग्री पर्यंत गरम केली जाते. त्यामुळे येथे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, असं आयएआरसीने सांगितलं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


 


संबंधित बातम्या


Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार


Skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत