Leg Pain in Night : दिवसातील कित्येक तास काम करणाऱ्या लोकांना पायदुखीची (Leg Pain) समस्या जाणवते. अनेकदा रात्री झोपताना पाय दुखतात. पायदुखीच्या समस्येमुळे झोप देखील व्यवस्थित होत नाही. सतत पायदुखत असतील तर तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करु शकता. फॉलो करा 'या' टिप्स-


झोपायच्या आधी पायांची मालिश करा
रात्री झोपण्याच्या आधी पायांची मालिश करा. मालिश करताना तुम्ही लसूण आणि मोहरीच्या तेलाचा वापर करु शकता. हे तेल गरम करुन पायांना लावा. तेल लावल्यानंतर हलक्या हातानं पायांचा मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच रात्री झोपायच्या आधी पायाच्या खालच्या बाजूला उशी ठेवा. ज्यामुळे जर पायांना सूज आली असेल तर ती कमी होईल आणि पाय दुखणार नाहीत.  


व्यायाम करा


पाय दुखत असतील तर रोज सकाळी उठल्यानंतर पायाचा व्ययाम करा. व्यायाम केल्यानं पायाच्या भागात रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पायदुखी कमी होते.  पायदुखी होत असेल तर तुम्ही योगा देखील करु शकता. योगा केल्यानं शरीरात ब्लड सर्कुलेशन चांगलं होते. रक्त प्रवाह चांगला झाल्यानं पाय दुखीची समस्या जाणवत नाही तसेच योगामुळे शरीर डिटॉक्स देखील होते. रात्री झोपायच्या आधी वज्रासन करावं. यामुळे पायदुखी कमी होते तसेच पचनक्रिया देखील चांगली होते. 


मेथीचे पाणी प्या
मेथीच्या पाण्यामध्ये अँटिऑक्सीडेंट आणि अँटिफ्लेमेटरी ही तत्वे असतात. ज्यामुळे पाय दुखी कमी होते. यासाठी दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये दोन चमचा मेथीचे दाणे टाका. हे दाणे रात्रभर पाण्यात ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी प्या. यामुळे पाय दुखील कमी होते. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला तर तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढेल आणि पायदुखी देखील कमी होईल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :