Shane Warne Birth Anniversary: ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (shane Warne) हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्यानं आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. याचवर्षी मार्च महिन्यात शेन वॉर्ननं वयाच्या 52 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नचा आज 53व्या वाढदिवसानिमित्त त्याची उल्लेखनीय कारकिर्द, त्यानं रचलेले विश्वविक्रम आणि भारताविरुद्ध त्याची कामगिरी कशी होती? यावर एक नजर टाकुयात.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू शेन वॉर्नचा याचवर्षी 4 मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वॉर्न मृत्यूच्या वेळी थायलंडमध्ये होता. वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. वॉर्ननं जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या करिष्माई गोलंदाजीनं ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केलीय.
शेन वॉर्नची नेत्रदिपक कामगिरी
- कसोटी क्रिकेटमध्ये शेन वॉर्नच्या नावावर एकूण 708 विकेट्सची नोंद आहे.
- मुथय्या मुरलीधरननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 विकेट्सचा टप्पा गाठणार जगातील दुसरा गोलंदाज.
- एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 194 सामन्यात 293 विकेट्सची नोंद
- सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं त्याच्या कारकिर्दीत तब्बल 37 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
- एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम, शेन वॉर्ननं 2005 मध्ये 96 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या.
- शेन वॉर्ननं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 13 अर्धशतक झळकावली आहेत.
इंटरेस्टींग फॅक्ट
- वॉर्न 2000 मध्ये विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द सेंच्युरीच्या एलिट यादीतील टॉप-5 खेळाडूंपैकी एक होता.
- 1993 मध्ये इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगला बाद करण्यासाठी त्यानं 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकला होता, ज्याची आजही चर्चा आहे.
-2003 मध्ये ड्रग्जच्या आरोपात दोषी आढळल्यानंतर क्रिकेटमधून एक वर्षाची बंदी घालण्यात आली
- ऑस्ट्रेलियानं 1999 मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा तो संघाचा भाग होता.
- 1999 च्या विश्वचषकातील वॉर्ननं सर्वाधिक 20 विकेट्स घेतले होते.
- शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं आयपीएलचा पहिला खिताब जिंकला.
भारताविरुद्ध शेन वार्नची कामगिरी
- वॉर्ननं 2004 साली भारताविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. त्यावेळी त्यानं 125 धावा खर्च करून भारताच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं होतं.
- भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात 2001 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ 176 धावांवर आलऑलट झाला होता. त्याला शेन वॉर्न कारणीभूत होता. त्यानं या सामन्यात भारताच्या चार महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. ऑस्ट्रेलियानं हा सामना 10 विकेट्सनं जिंकला होता.
- भारताविरुद्ध 1998 मध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शेन वॉर्ननं चमकदार कामगिरी करून दाखवली. या सामन्यात त्यानं चार विकेट्स घेऊन संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. परंतु, भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं हा सामना 179 धावांनी जिंकला होता.
- भारताविरुद्ध 2001 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात 10 षटकात 38 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या होत्या.
हे देखील वाचा-